नागपूर: एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र चहापान केला. त्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए)  अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील रवीभवन येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले, माझ्या माहितीनुसार तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम ऑफ रूपी या पुस्तकाला शंभर वर्षे झाल्याबद्दल कार्यक्रम होता. त्यात दोन्ही नेते एकत्र आल्याने त्यांनी सोबत चहापान केला. यावेळी राजकीय चर्चा झाली नसल्याचे दोघांचेही म्हणने आहे. परंतु चहा पितांना तेथे दोघांमध्ये काही छुपी गडबड झाली काय? हे पहावे लागेल. दरम्यान सध्यातरी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत नाही. ते त्यांच्यासोबत जाणार नसल्याचे मला वाटते, असेही आठवले म्हणाले. दरम्यान रिपब्लिकन पक्षाचे सगळे गट एकत्र येऊन प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे नेतृत्व करावे. मीही त्यांच्या सोबत यायला तयार आहे. परंतु सध्यातरी अशी स्थिती दिसत नसल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीत आमचा पक्ष मध्य प्रदेशमध्ये एकही जागा लढ‌वणार नसून भाजपला पाठिंबा देणार आहे. परंतु तेलांगणा व राजस्थानात काही जागा लढवल्या जाणार असल्याची घोषणाही आठवले यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp national president sharad pawar and vanchit bahujan vikas aghadi president prakash ambedkar together at an event in mumbai mnb 82 amy