नागपूर : केंद्रात एनडीएच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तारूढ झाले असून आता सर्वांचे लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागले आहे. २४ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार आहेत. त्याअनुषंगाने विविध मंत्र्यांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. विदर्भातील नैसर्गिक संसाधन तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्र पाठवून विदर्भात स्टील इंडस्ट्रीला वाव असल्याने रेल्वे डब्बे निर्मिती प्रकल्प व इतर रेल्वे सुविधांबाबत प्रस्ताव दिला आहे.

माहेश्वरी त्यांच्या प्रस्तावात म्हणतात, नागपूर हे मध्य भारतातील जलद गतीने विकसित होत असलेले महानगर आहे. नागपूर च्या १५० किमी क्षेत्रात २० हजार मेगावॅट औष्णिक वीजनिर्मितीमुळे प्रदूषण वाढले आहे. त्यातून आरोग्य आणि अनेक समस्यां निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रदुषण कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागपूरसाठी ४ ईएमयू (इलेक्ट्रो मॅग्नेटिक युनिट्स) मुंबई लोकल सारखे ट्रेन चा विचार करणे आवश्यक आहे .जेणेकरून जास्तीत जास्त लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील. शहरातील कोंडीची समस्या कमी होईल . गरीब शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचू शकेल. गावा वरून येणे जाणे करुन शहरात राहण्याचा खर्च वाचू शकते अशाप्रकारे लोकल ट्रेन्स नागपूर ते अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि छिंदवाडा अशा ४ मार्गांवर ११० लहान गावांना कनेक्टिव्हिटी मिळेल, विद्युतीकरण आधीच झाले आहे आणि या मार्गांवर नवीन तिसरी लाईन स्थापन केल्यामुळे शहराच्या गावांमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मदत होऊ शकते.

हेही वाचा…नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मध्य भारतातील नागपूर येथे दोन विभागीय कार्यालये कार्यरत आहेत आणि परस्पर सामंजस्याने दुर्ग येथे संपलेल्या सर्व गाड्या नागपूरपर्यंत वाढवता येतील आणि नागपूरला संपलेल्या सर्व गाड्या दुर्गपर्यंत वाढवता येतील. दोन्ही बाजूंच्या या ३ तासांच्या विस्तारामुळे अनेक स्थानकांना नवीन गाड्या मिळण्यास मदत होणार आहे. जादा प्रवाशांचा भार उचलण्यासाठी ४-५ अतिरिक्त डबे असण्याची शक्यता असलेल्या बहुतांश गाड्यांमध्ये आहेत. अलीकडे काही वर्षांपूर्वी गोंदिया जबलपूर ट्रॅक चे काम पूर्ण झाले आहे. चेन्नई बंगलोर ते वाराणसी प्रयागराज मार्गावर वेळ कमी करण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी या मार्गा ची प्रचंड क्षमता आणि मदत प्रवाशांना होऊ शकते. कृपया या मार्गावर नवीन गाड्या सुरू करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करा.

गडचिरोली परिसरातून लोहखनिजाचे दररोज ५-६ रेक विविध गंतव्यस्थानांवर लोड करून रेल्वेला मोठे उत्पन्न मिळत आहे. आता गडचिरोली या स्टील सिटीमध्ये अंदाजे १० दश लक्ष टन स्टील बनवण्याच्या क्षमतेसह प्रकल्प येत आहे. येथे भारतीय रेल्वेने नवीन कोच फॅक्टरीची योजना आखली पाहिजे, जसे की जवळील स्टीलचा वापर करून मोठ्या रोजगार निर्मितीचे प्रकल्प. विकसित विदर्भ क्षेत्रांतर्गत रेल्वेकडून डाऊन स्ट्रीम इंडस्ट्रीसारखे समर्थन आवश्यक आहे.

हेही वाचा…बुलढाणा जिल्ह्यातील जिगावमधून अकोल्यासाठी पाणी आरक्षित

रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या भेटीत या प्रकल्पांवर चर्चा केली जाऊ शकते आणि येत्या २४ जुलै रोजी येणाऱ्या अर्थसंकल्पात त्यांची घोषणा करणे आवश्यक आहे, असे स्ट्रॅटेजिस्ट नॅचरल रिसोर्सेस तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी गडकरी यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे .