नवी मुंबई : मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात शनिवार वाशी येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे, याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल नवी मुंबई भाजपा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी आश्चर्य व्यक्त केले. सदर आंदोलन आज वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in