Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी होत आहे. खरं तर मुंबई महानगरातील दुसरं मोठं हे विमानतळ ठरणार आहे. या विमानतळामुळे या परिसरातील आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण कमी करण्याच्या पार्श्वभीवर दुसऱ्या विमानतळाची गरज गेल्या जवळपास तीन दशकांपासून चर्चेत होती. त्यानंतर आता या विमानतळाचं उद्घाटन पार पडत आहे. या नवी मुंबई विमानतळाच्या घोषणेपासून ते उद्घाटनापर्यंत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

विमानतळाची पायाभरणी कधी झाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१८ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात आली होती. तेव्हापासून या विमानतळाच्या प्रकल्पाचं काम सुरु होतं.

फडणवीस आणि शिंदेंनी केली होती विमानतळाची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली होती.

विमानाची यशस्वी चाचणी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी हवाईदलाचे सी-२९५ आणि सुखोई या दोन विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं होतं. या यशस्वी चाचण्यांनंतर आता या विमानतळाचं उद्घाटन पार पडत आहे.

नवी मुंबई विमानतळाचं उद्धघाटन कधी?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीत या विमानतळाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी दिग्गज नेते या उद्घाटनासाठी उपस्थित असणार आहेत.

विमानतळाचं खास वैशिष्ट्ये काय?

लंडनस्थित झहा अदीद या वास्तूविशारद कंपनीने या विमानतळाचं डिझाइन केलेलं आहे. स्टील आणि काचेपासून तयार केलेलं “फ्लोटिंग लोटस” हे या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचं आकर्षण ठरणार आहे.

विमानसेवा कधी सुरू होणार?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावरुन पहिलं उड्डाण डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. कोणती एअरलाईन पहिली उड्डाणे घेईल याविषयी स्पष्टता नसली तरी इंडिगो कंपनीचे विमान येथून पहिल्यांदा आकाशात उड्डाण घेईल असं बोललं जात आहे. एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर या तीन विमान कंपन्यांनी अदानी कंपनीसोबत करार केले आहेत.

दि.बा.पाटील यांचं नाव?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.त्या पार्श्वभीवर या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची ग्वाही सरकारने दिलेली आहे. खरं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला गती तर मिळणार आहे. तसेच हजारो रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.