नवी मुंबई : नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पार पडले. या विमानतळावरून २५ डिसेंबर रोजी देशातील अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआय) औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू केले जाणार आहे. दरम्यान या विमानतळावरून प्रवाशांना कोणकोणत्या ठिकाणी पर्यटनासाठी जाता येणार आणि त्यांच्या किंमतीची माहिती घेऊया.
उद्घाटनानंतर केवळ दोन महिन्यांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवेसाठी सज्ज झाले आहे. नवी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे राहणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास वेळ कमी झाला आहे. पहिला टप्पा भारतातील प्रमुख महानगरे आणि प्रमुख केंद्रांशी थेट वाहतूक सुरू होत आहे. ज्यांचे संचालित अकासा एअर आणि इंडिगो द्वारे केले जाते आणि त्यानंतर एअर इंडियाचा देखील सहभाग असणार आहे. डिसेंबर महिन्यात अनेकजण पर्यटनाचा बेत आखत असतात, तर अनेकांना कामानिमित्त जावे लागत असते. तरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणाची माहिती, एअरलाइन सेवा, वेळा आणि तारीख अशा असणार आहेत.
दिल्लीसाठी
अकासा एअर (QP १८३२): नवी मुंबईहून सकाळी ८.५० वाजता निघते आणि दिल्लीत सकाळी ११.१५ वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
याचे तिकीट १६,४०५ रुपयांपासून सुरू होते.
इंडिगो (6E 5263): नवी मुंबईहून सकाळी ९.२५ वाजता निघते आणि दिल्लीत सकाळी ११.१५ वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
याचे तिकीट १०,५०० रुपयांपासून पासून सुरू होते.
गोव्या साठी
अकासा एअर (QP 1927): नवी मुंबईहून संध्याकाळी ५ .४० वाजता निघते आणि गोव्यात संध्याकाळी ६.५५ वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
तिकीट : ७,८०० रुपयांपासून सुरू होते.
इंडिगो (6E 2054): नवी मुंबईहून दुपारी ४ वाजता निघते आणि मोपा येथे सायंकाळी ५:०५ वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
तिकीट : ८,५३३ रुपयांपासून सुरू होते.
कोची साठी
अकासा एअर (QP 1915): नवी मुंबईहून दुपारी १.३० वाजता निघते आणि कोचीला दुपारी ३.३० वाजता पोहोचते (२६ डिसेंबरपासून सुरु होत आहे).
तिकीट : १५,४०० रुपयांपासून सुरू होते.
इंडिगो (6E 908): नवी मुंबईहून संध्याकाळी ६.२५ वाजता निघते आणि कोचीला रात्री ८.२० वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
तिकीट: रु.१२,६२४ पासून सुरू होते.
अहमदाबाद साठी
अकासा एअर (QP 1916): नवी मुंबईहून संध्याकाळी ५.४० वाजता निघते आणि अहमदाबादला संध्याकाळी ६.५० वाजता पोहोचते (२६ डिसेंबरपासून सुरू होत आहे.)
तिकीट: ७,००० रुपयांपासून सुरू होते.
इंडिगो (6E 837): नवी मुंबईहून सकाळी १०.१० वाजता सुटते आणि अहमदाबादला सकाळी ११.१५ वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
तिकीट ५,४८३ रुपयांपासून सुरू होते.
बंगळुरूला
इंडिगो (6E 461): नवी मुंबईहून संध्याकाळी ७.४५ वाजता निघते आणि बेंगळुरूला रात्री ९.३५ वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
तिकीट रु. ५,३१५ पासून सुरू होते.
हैदराबादला
इंडिगो (6E 882): नवी मुंबईहून सकाळी ८.४० वाजता सुटते आणि हैदराबादला सकाळी ९.५५ वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
तिकीट रु. ७,७१७ पासून सुरू होते.
लखनौ साठी
इंडिगो (6E 830): नवी मुंबईहून संध्याकाळी ७.३० वाजता सुटते आणि लखनऊला रात्री ९.२६ वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
तिकीट : ६,०११ रुपयांपासून सुरू होते.
कोइम्बतूर साठी
इंडिगो (6E 882 + 6E 6646): नवी मुंबईहून सकाळी ८.४० वाजता निघते आणि कोइम्बतूरला ४.०५ वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
तिकीट रु.१२,४५३ पासून सुरू होत आहे.
नागपूर साठी
इंडिगो (6E 817): नवी मुंबईहून दुपारी १.४५ वाजता सुटेल आणि नागपूरला दुपारी ३.२० वाजता पोहोचेल (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
तिकीट ५,३२६ रुपयांपासून सुरू होईल.
जयपूर साठी
इंडिगो (6E 837+ 6E 7523): नवी मुंबईहून सकाळी १०.१० वाजता निघते आणि जयपूरला संध्याकाळी ५.१५ वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
तिकीट ९,३६५ रुपयांपासून सुरू होते.
जम्मू साठी
इंडिगो (6E 5263 + 6E 2283): नवी मुंबईहून सकाळी ९.२५ वाजता निघते आणि जम्मूला संध्याकाळी ७.४० वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून सुरू होत आहे).
तिकीट १५,५९५ रुपयांपासून सुरू होते.
विमान कंपन्यांच्या वेबसाइटवरून विमान तिकिटांचे बुकिंग करता येणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अशा विविध ठिकाणी प्रवाशांना जाता येणार आहे.
