Premium

बेलापूर ते पनवेल दरम्यान एनएमएमटीची जादा बस सेवा

रेल्वे स्थानकाऐवजी बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

NMMT additional bus service megablock Belapur Panvel railway station
बेलापूर ते पनवेल दरम्यान एनएमएमटीची जादा बस सेवा (संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पनवेल रेल्वे स्थानक येथे मुख्य पायाभूत सुविधा संबंधित कामकाजाकरीता बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक या दरम्यान दि. ३० सप्टेंबर रोजी रात्रौ ११ पासून ते दिनांक २ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ३८ तासांचा मेगाब्लॉक घेतलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान लोकल रेल्वेची सेवा बंद राहणार आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून मेगाब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीकरीता २८ विशेष बसेसने २३२ फेऱ्यांद्वारे बससेवा देण्यात येणार आहे.

हेही वाचा… उरण – फुंडे रस्ता की तलाव मार्ग? खड्ड्यातून तीन गावातील नागरिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

याव्यतिरिक्त बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान दैनंदिन धावणाऱ्या विविध मार्गाच्या ४६ बसेसच्या १९६ फेऱ्या देखिल प्रवाशांना उपलब्ध होतील. मेगाब्लॉक कालावधीत खारघर व तळोजा विभागातून विविध मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खारघर रेल्वे स्थानकाऐवजी बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच खारघर रेल्वे स्थानक येथून सुटणारे मार्ग हे बेलापूर रेल्वे स्थानक येथून सुटणार आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nmmt additional bus service has been provided due to the megablock on belapur to panvel railway station dvr

First published on: 30-09-2023 at 16:39 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा