पनवेल जवळ एक मालगाडी रुळावरून घसरली होती. त्यामुळे कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या ट्रेन खोळंबल्या. त्यात एका प्रवाशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाचा क्रमांक मिळवला व फोन करून कैफियत मांडली. आणि काही वेळातच प्रवाशांना मदत मिळणे सुरू झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
शनिवारी दुपारी पनवेल स्टेशन पासून काही काही अंतरावर एक माल गाडी रुळावरून घसरली. या अपघातामुळे कोकण दिशेला जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. सदर अपघात दुपारी तीनच्या सुमारास झाला अद्याप काम सुरू आहे , ट्रेन पनवेलच्या पुढे जाऊ शकत नाही हे सर्व माहिती असतानाही रेल्वे प्रशासनाने दादर ते सावंतवाडी ही तुतारी ट्रेन सोडली. मात्र रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे या ट्रेन मधील प्रवाशांना भूतो ना भविष्यती असा मनस्ताप सहन करावा लागला. ही रात्री बाराला सुटलेली ट्रेन थांबत थांबत एकच्या सुमारास कळंबोली नजीक नावडे स्टेशनवर थांबली ते तब्बल १२ तास. रात्रभर प्रवासी झोपलेले असल्याने त्यांतील बहुतांश जणांना जाणवले नाही . मात्र सकाळ होताच अजून पनवेल सुद्धा आले नाल्याने हाहाकार उडाला. त्यात वीज गेलेली, पाणी नाही खायला अन्न नाही अशी अवस्था झालेली. त्यात सर्वात जास्त कुचंबणा झाली ते सकाळचे ऐहिक कुठे उरकायचे कारण सकाळी ७/८ पर्यंत स्वच्छतागृहातातील पाणीही संपलेले.
हेही वाचा >>> २९ तास रखडपट्टी; कोकण रेल्वेवर प्रवाशांचे अतोनात हाल, मालगाडी घसरल्याने अनेक गाडय़ांचा खोळंबा
या सर्वात कहर म्हणजे नेमके काय झाले ? याबाबत कोणाला माहिती नव्हते. प्रवाशांचा संताप पाहून पायलट सुरक्षेला केवळ एक पोलीस कर्मचारी मात्र उपस्थित झाला होता.
त्या दरम्यान मुंबई बी ए आर सी वसाहतीत राहणारे सुहास कांबळे या प्रवाशाने अनेक ठिकाणी फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. नऊच्या सुमारास त्यांनी शिंदे यांना फोन लावला सदर फोन मुळे नावाच्या व्यक्तीने उचलला. त्यांना सर्व परिस्थिती कथन केल्यावर काही वेळात आवश्यक मदत मिळेल असे सांगण्यात आले. आणि अर्धा पाऊण तासात नवी मुंबईतील शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पाटकर आपल्या काही कार्यकर्त्यांसह पोहचले त्यांनी सर्व प्रवाशांना पाणी आणि बिस्कीट दिले. आम्हाला विकत सुद्धा पाणी मिळत नव्हते त्यात नेमके कुठे आहोत हे माहिती नव्हते. आपण शोधाशोध करत असताना गाडी सुटेल या भीतीने लांबवर जाताही येत नव्हते अशात पाणी आणि बिस्कीट मोलाचे ठरले . ही सर्व आपबीती सुहास कांबळे या प्रवाशाने लोकसत्ताला सांगितली .
हेही वाचा >>>पनवेल: रेल्वे प्रशासनात आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा
या ट्रेन मधील अनेकांना सकाळ पर्यंत विशेष करून पाण्याची मदत मिळाल्यावर आपण कुठे आहोत हे समोर आल्याने अनेक प्रवाशांनी अन्य वाहनाने परतीचा मार्ग धरला त्यात मी सुद्धा आहे. असेही कांबळे यांनी सांगितले. या दरम्यान रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ आणि समन्वय शून्य कारभार, तसेच प्रवाशांशी अमानवीय वागणूक समोर आली. अपघात झाला मार्ग तात्काळ पूर्ववत होणार नाही हे सजल्यावर दादारलाच ट्रेन रद्द केली असती तर एवढा जीवघेणा मनस्ताप झाला नसता अशी खंत कांबळे यांनी व्यक्त केली. ट्रेन मधील बहुतांश प्रवासी हे पितृपक्ष निमित्त मूळ गावी निघाले होते. त्यामुळे अनेक पूर्ण कुटुंबाच्या कुटुंबाचा प्रवासी मध्ये समावेश होता. आमच्या कडे फारसे पैसे नसल्याने कितीही राग आला तरी निमूटपणे याच लोकलने मार्गस्थ झालो. अशी माहिती प्रवीण तांबे या प्रवाशाने दिली.
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call zws
First published on: 02-10-2023 at 15:38 IST