पनवेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्यावतीने लीना गरड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनी राजीनामास्त्र उघारुन शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा जाहीर प्रचार सूरु केल्याने निवडणूकीला अवघे १२ दिवस शिल्लक असताना स्थानिक शिवसैनिकांची सुटलेली साथ ही गरड यांना परवडणारी नसून गरड या प्रचारात पिछाडीवर आणि एकाकी पडल्याचे चित्र आहे. पनवेलमधील ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक, मराठा समाजाची पनवेलमधील मते आणि पनवेलमधील शहरी मतदारांच्या मतांचे गणित मांडून या निवडणूकीत शिवसेनेच्या लीना गरड यांनी उडी घेतली आहे. साडेतीन लाख मालमत्ता करदात्यांपैकी अडीच लाख करदात्यांनी अजूनही कर पालिकेला दिला नसल्याने कर न भरणा-यांचा गरड यांना पाठिंबा असल्याचे गणित ठाकरेंच्या शिवसेनेच्या चाणक्यांनी मांडले आहे. परंतू प्रत्यक्षात गरड यांचा प्रचार समाजमाध्यमांवर वेगाने आणि घराच्या दारापर्यंत उमेदवार फीरताना कमी दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा