लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई: हिंदू आणि मुस्लिम समाजाचे सण एकाच दिवशी असेल तर सर्वाधिक ताण दबाव असतो ते पोलिसांवर. कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता शांतता व सुव्यवस्था राखण्याची जवाबदारी पोलिसांवर असते. यंदाही ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन  एकाच वेळेस येत आहे. त्यात गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद जुलूस एकाच दिवशी असल्याने पोलिसांवर खूप ताण आहे . याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात  शांतता बैठकीचे आयोजन केले होते. यात पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी एक आवाहन मुस्लिम बांधवांना केले आणि तात्काळ मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद दिला आणि पोलिसांचा वरील मोठा ताण कमी झाला. 

ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन  एकाच वेळेस येत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी. असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले. गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईदचा जुलूस एकाच दिवशी आहे. काही ठिकाणी  ठिकाणी दुसऱ्या दिवशी ईद निमित्ताची मिरवणूक काढण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.

हेही वाचा… मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुनर्विकासाच्या उंबरठ्यावर…

त्यामुळे नवी मुंबईतही असा निर्णय घ्यावा असे आवाहन विवेक पानसरे यांनी केले. त्यांचे भाषण सुरू असतानाच आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत मुस्लिम एकता फाउंडेशनचे आलम बाबा, व सुन्नी जमियात उल्मा  आणि उम्मीद वेल्फेअर फाउंडेशनचे मिराज शहा यांनी ही विनंती मान्य करत विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी ईद निमित्त मिरवणूक काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता २८ ऐवजी २९ सप्टेंबरला मिरवणूक निघणार आहे. उपस्थित सर्वांनीच टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. गणेश मंडळ प्रतिनिधी म्हणून भाषण करताना माजी विरोधीपक्ष नेते दशरथ भगत आणि मनपा उपायुक्त श्रीराम पवार यांनीही मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे स्वागत केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The navi mumbai police requested the muslim community to avoid any untoward incident since eid e milad and ganapati visarjan are coming at the same time dvr