नवी मुंबई: मंगळवारी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. देवी विसर्जन दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी सकाळी सात ते बुधवारी सकाळी सात पर्यंत जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये रस्त्यांवर होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी मंगळवार (दिनांक २४/१०/२०२३) सकाळी ०७.०० वाजल्यापासून ते बुधवार (दिनांक २५/१०/२०२३) सकाळी ०७.०० वाजेपर्यंत नवी मुंबई कार्यक्षेत्रातून बृहन्मुंबईच्या व ठाणे हद्यीत जाणा-या तसेच बृहन्मुंबईच्या व ठाणे हद्यीतून नवी मुंबईत प्रवेश करणा-या सर्व जड व अवजड वाहनांना प्रवेश करण्यास निर्बंध घालून तशी अधिसूचना निर्गमीत करण्यात आली आहे.

हेही वाचा… उरणकरांना सुवार्ता, शहरातील कोंडीवरील उतारा असलेल्या बाह्यवळण मार्गाचे काम वेगात; २०२४ मध्ये काम पूर्ण होणार

सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रवासी वाहतुक करणा-या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To avoid traffic congestion during devi visarjan entry of heavy vehicles has been banned from tuesday to wednesday in navi mumbai dvr