• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. devendra fadanvis declared shrikant shinde is the candidate from kalyan mahayuti candidate spl

Photos: श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची फडणवीसांनी केली घोषणा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारीबाबत सर्वच पक्ष दबक्या पावलांनी आपल्या भूमिका घेताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Updated: April 7, 2024 17:17 IST
Follow Us
  • shrikant shinde news
    1/9

    लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता वेगवेगळ्या नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत आहे. काही जागांवर पक्षांचे उमेदवार निश्चित होत नाहीत तर काही ठिकाणी नाराजी ओढवून घेणे, पक्षांना मतदानाचा विचार करता परवडणारे नाही. त्यामुळे सर्वच पक्ष दबक्या पावलांनी आपल्या भूमिका मांडताना दिसत आहेत. (फोटो साभार-Dr Shrikant Eknath Shinde/Facebook Page)

  • 2/9

    शिवसेना (शिंदे गट) पक्षाने काही उमेदवार घोषित केले होते त्यातील हिंगोली मधील लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी शिंदेंनी मागे घेतली हाती. तर दुसऱ्या बाजूला बहुचर्चित कल्याण मतदासंघांतून श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार असतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परस्पर जाहीर केलं आहे. (फोटो साभार-Dr Shrikant Eknath Shinde/Facebook Page)

  • 3/9

    श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाण्यामध्ये त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून जल्लोष केला. परंतु त्यांना आवरते घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे समजते आहे. पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर आनंद व्यक्त करा, असे पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. (फोटो साभार-Dr Shrikant Eknath Shinde/Facebook Page)

  • 4/9

    फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले, “कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विषय क्लिअर होता. कल्याणमध्ये युतीचे कार्यकर्ते, नेत्यांच्या बैठका, गाठीभेटींना सुरुवात झाली आहे. मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सगळे मिळून एकदिलाने कामाला लागले आहेत. प्रचाराला सुरुवात झाली आहे. मी फडणवीसांचं स्वागत करतो. कल्याण लोकसभेमधून मी मोठ्या मताधिक्क्याने जिंकून येईन. (फोटो साभार-Dr Shrikant Eknath Shinde/Facebook Page)

  • 5/9

    “महायुतीचा प्रत्येक खासदार निवडून आणण्यासाठी नेते काम करत आहेत. अशा परिस्थितीत कल्याण पूर्व भागातील काही गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते व्यक्तिगत स्वार्थासाठी महायुतीचे संबंध बिघडवत असतील तर ते चुकीचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात त्यांच्या कार्यकर्त्यांना जे सांगायचे ते सांगितले आहे. त्यामुळे याविषयी अधिक बोलणे योग्य नाही.” टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांनी महायुतीमधील संबंधावर भाष्य केले आहे. (फोटो साभार-Dr Shrikant Eknath Shinde/Facebook Page)

  • 6/9

    मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेची उमेदवारी अद्याप जाहीर केली नाही. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, “आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं”, असा डायलॉग त्यांनी मारला. “आधी सर्व सहकाऱ्यांची यादी जाहीर केली. त्यानंतर श्रीकांतचे नाव जाहीर करेल. माझ्याजागी दुसरा कुणी असता तर पहिल्याच यादीत मुलाचे नाव जाहीर केले असते. पण मी कार्यकर्त्यांचा नेता असल्यामुळे आधी कार्यकर्त्यांचे काम करतो.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. (फोटो साभार-Eknath Shinde-एकनाथ संभाजी शिंदे /Facebook Page)

  • 7/9

    ठाकरे गटाच्या कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली? ठाकरे गटाची उमेदवारी उशिराने जाहीर झाली असली तरीही निवडणुकीसाठीची तयारी पक्षाने आधीपासूनच सुरू केली होती. आम्ही फक्त उमेदवार घोषित होण्याची वाट पाहत होतो, असं वैशाली दरेकर म्हणाल्या. (फोटो साभार-Vaishali Darekar Rane /Facebook Page)

  • 8/9

    कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांना कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (उबाठा) यांनी राजकीय खेळी खेळली आहे. तर,महायुतीने ही जागा शिंदे गटाला सोडून श्रीकांत शिंदे यांना संधी दिली आहे. वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे यांच्यात ही खरी लढत होणार आहे. (फोटो साभार-Dr Shrikant Eknath Shinde/Facebook Page)

  • 9/9

    हेही पहा- Loksabha Election 2024: शिवसेना उबाठा गटाला धक्का, बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार समर्थकांसह शिंदे गटात

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeकल्याणKalyanडॉ. श्रीकांत शिंदेभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv Sena

Web Title: Devendra fadanvis declared shrikant shinde is the candidate from kalyan mahayuti candidate spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.