• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. uddhav thackeray reply to prime minister narendra modi and amit shah on the fake shiv sena statement spl

उद्धव ठाकरे पालघर सभा: ‘नकली शिवसेना’ वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काय दिले प्रत्युत्तर?

उद्धव ठाकरेंनी पालघरच्या सभेतून नकली शिवसेना वक्तव्यावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले आहे.

April 13, 2024 11:25 IST
Follow Us
  • uddhav thackeray palghar sabha
    1/10

    बोईसरमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. (सर्व फोटो साभार- ShivSena/Facebook Page)

  • 2/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा केला होता.

  • 3/10

    पंतप्रधान मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

  • 4/10

    “तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे

  • 5/10

    “महाराष्ट्रात मोदींच नाणं चालणार नाही, इथे फक्त ठाकरे आणि पवारांचं नाणं चालणार,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 6/10

    “गद्दारांचे दोन मालक सध्या महाराष्ट्रात फिरत आहेत. मी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते, मी यापुढे देशाच्या पंतप्रधानांवर टीका करणार नाही, तर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार आहे. ज्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केली, त्या शिवसेनेला महाराष्ट्रात येऊन तुम्ही नकली म्हणता? पण नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

  • 7/10

    उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अमित शाह आले तेदेखील म्हणाले शिवसेना नकली आहे. आता मी भारतीय जनता पक्षाला म्हणतो की हा पक्ष भेकड आहे. मी भाजपाला भेकड यासाठी म्हणतो, कारण ईडी सीबीआय लावून दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात.”

  • 8/10

    “मी अमित शाहांना विचारतो, तुमच्या भाजपात खऱ्या भाजपाचे किती नेते राहिले बघा. उद्धव ठाकरे जर संपले असतील तर मग विश्वगुरु असणारे पंतप्रधान मोदी यांना उद्धव ठाकरेंवर का बोलावे लागतेय.”

  • 9/10

    “तिकडे चीन अरुणाचल प्रदेशमध्ये घुसत आहे. चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. मात्र, माझे त्यांना आव्हान आहे, उद्धव ठाकरेंना संपून दाखवा”, असेही ते म्हणाले.

  • 10/10

    हेही पहा- Loksabha Election 2024: कोल्हापूरमध्ये शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक सामना; कोण आहेत संजय मंडलिक? जाणून घ्या

TOPICS
अमित शाहAmit Shahउद्धव ठाकरेUddhav Thackerayनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionशरद पवारSharad PawarशिवसेनाShiv Sena

Web Title: Uddhav thackeray reply to prime minister narendra modi and amit shah on the fake shiv sena statement spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.