• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. rahul gandhi campaion in statement on narendra modi criticism of modi and bjp latest news from maharashtra spl

Loksabha Election 2024: राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका; म्हणाले “स्वतःला ओबीसी म्हणतात, दहा वर्षात..”

राहुल गांधी यांनी या सभेतून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Updated: April 14, 2024 12:44 IST
Follow Us
  • rahul gandhi on narendra modi
    1/10

    महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील साकोली तालुक्यातील चांदूरवाफा येथे आयोजित प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते.

  • 2/10

    या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार चंद्रकात हंडोरे उपस्थित होते.

  • 3/10

    राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांत मोदींनी काही निवडक उद्यद्योगपतींसाठी सरकार चालवले.

  • राहुल गांधी म्हणाले, “अदानी यांच्यावर विशेष कृपादृष्टी होती. मुंबई विमानतळ त्यांना देण्यात आले. त्यासाठी सीबीआयचा वापर करण्यात आला. तसेच देशातील सर्व बंदरे, रेल्वे, खाणी, कोळसा, वीज अदानी आणि आणखी ९-१० अब्जाधीशांना वाटण्यात आली.”
    “सरकारच्या या धोरणामुळे जेवढी संपत्ती ७० कोटी लोकांकडे नसेल तेवढी संपत्ती केवळ या २२ उद्यद्योगपतींकडे जमा झाली.
    देशात बरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे मोदींना लक्ष देण्यास वेळ नाही.” अशी टीका त्यांनी भाजपा सरकारवर केली.
    “पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र धर्म, हिंदू- मुस्लिम यांवर बोलतात आणि समाजात तेढ निर्माण करतात. ते कधी समुद्रात एकटेच पूजा करतात, त्यांना तेथे पुजारी लागत नाही. हवाई दलाच्या विमाने आकाशात उडतात. ते स्वतःला ओबीसी म्हणतात. पण ओबीसींसाठी त्यांनी गेल्या दहा वर्षांत एकही योजना आणली नाही,” असे राहुल यांनी सांगितले.
  • 4/10

    राहुल गांधी म्हणाले, “केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आम्ही आंतरवासिता अधिकार देऊ. यामुळे प्रत्येक पदविका, पदवी प्राप्त युवकांना शासकीय, खासगी कंपनी, कार्यालयात एक वर्ष प्रशिक्षणाची संधी मिळेल. तसेच वर्षभरात एक लाख रुपये मिळू शकतील.”

  • “पेपर फुटीविरुद्ध कायदा आणि शेतमाल खरेदीसाठी एमएसपी कायदा केला जाईल. शिवाय ३० लाख रिक्त पदे भरू, अग्निवीर योजना बंद करू, प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला महिन्याला ८५०० रुपये देण्यात येईल,” असेही आश्वासन राहुल यांनी दिले.
  • 5/10

    “नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणतात. पण ओबीसींसाठी त्यांनी गेल्या दहा वर्षांत एकही योजना आणली नाही. मग ते ओबीसी कसे? मोदींनी ओबीसींसाठी काय केले हे सांगावे” अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले.

  • 6/10

    (सर्व फोटो साभार- Indian National Congress – Maharashtra/facebook Page)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsराहुल गांधीRahul Gandhiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Rahul gandhi campaion in statement on narendra modi criticism of modi and bjp latest news from maharashtra spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.