• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. a political party of indian actors which has gone beyond the veil of time spl

PHOTOS: भारतीय सिनेकलाकारांचा, काळाच्या पडद्याआड गेलेला एक राजकीय पक्ष

सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत, प्रचाराने वेग घेतला आहे. या निमित्ताने भारतातील बॉलिवूड कलाकारांच्या एका राजकीय पक्षाचा किस्सा जाणून घेऊयात.

Updated: April 14, 2024 17:27 IST
Follow Us
  • Lok Sabha elections
    1/10

    लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक बड्या व्यक्तींच्या राजकीय पक्षांमध्ये प्रवेशाचा टप्पा सुरू झाला आहे. अलीकडेच भाजपाने हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. (पीटीआय फोटो)

  • 2/10

    कंगना व्यतिरिक्त रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल, भोजपुरी अभिनेता रवी किशन आणि बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी हे देखील उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरलेले आहेत. (पीटीआय फोटो)

  • 3/10

    बॉलीवूड कलाकारांचा राजकारणात येण्याचा काळ खूप जुना आहे. याआधी विनोद खन्ना, राजेश खन्ना, जयाप्रदा, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, राज बब्बर, रजनीकांत आणि कमल हसन यांसारखे मोठे कलाकार राजकारणात आलेले आहेत. (पीटीआय फोटो)

  • 4/10

    पण तुम्हाला माहिती आहे का की, एकेकाळी सिनेकलाकारांनीही स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी जनमानसात प्रसिद्द असलेले अभिनेते देव आनंद यांना या पक्षाचे अध्यक्ष करण्यात आले होते. (पीटीआय फोटो)

  • 5/10

    १९७५ साली देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हा देशाच्या राजकारणात अनेक बदल झाले. नव्या पक्षांनी हा काळ स्वत:साठी मोठी संधी मानला. (Express archive Photo)

  • 6/10

    त्याच वेळी, इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीनंतर निवडणुकीत काँग्रेसला सत्तेवरून हटवण्याचा निर्धार चित्रपट कलाकारांनी केला होता. आणीबाणी संपल्यानंतर जनता सरकार आले. १९७७ मध्ये स्थापन झालेल्या जनता सरकारच्या पतनानंतर पुन्हा नव्या निवडणुका जाहीर झाल्या. (Express archive Photo)

  • 7/10

    जेव्हा जनता सरकार पडली आणि नवीन निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा बॉलिवूड कलाकारांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ४ सप्टेंबर १९७९ रोजी मुंबईत ‘National Party of India’ (NPI) स्थापनेची घोषणा झाली आणि पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला गेला. (Express archive Photo)

  • 8/10

    देव आनंद आणि त्यांचा भाऊ विजय आनंद, निर्माता-दिग्दर्शक व्ही. शांताराम, जीपी सिप्पी, श्रीराम बोहरा, आयएस जोहर, रामानंद सागर, आत्माराम, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र, हेमा मालिनी, साधना, संजीव कुमार, प्राण असे अनेक कलाकार तेव्हा या पक्षाचे सदस्य होते. कलाकारांच्या आकर्षणामुळे पक्षात मोठ्या संख्येने लोक सहभागी होत होते. (Express archive Photo)

  • 9/10

    पक्षाचा पहिला मेळावा मुंबईत झाला. या मेळाव्याला प्रचंड गर्दी जमली होती, ती गर्दी पाहून प्रस्थापित नेत्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सगळेच आश्चर्यचकित झाले. त्यामुळे जनता सरकार आणि काँग्रेस चांगलेच चिंतेत पडले. परंतु एन.पी. आय. पक्ष जसा चर्चेत आला तसाच तो अचानक चर्चेत येणे बंदही झाला. (Express archive Photo)

  • 10/10

    निवडणुका येतील जातील, निकाल कोणाच्याही बाजूने लागतील, परंतु कलाकार म्हणून कोणत्याही अडचणीशिवाय काम करत राहण्यासाठी कलाकारांनी राजकीय नेते आणि पक्षांसाठी अडचणीचे ठरू नये. असे सल्ले काँग्रेस आणि जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून एन. पी. आय. पक्षाच्या कलाकार सदस्यांना दिले जाऊ लागले होते. त्यामुळे अनेक सदस्य पक्ष सोडून जाऊ लागले. आणि देव आनंद एकाकी पडले. त्यानंतर त्यांनीही पुढे राजकीयदृष्ट्या आपल्या स्वप्नांना पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळालं. (Express archive Photo)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: A political party of indian actors which has gone beyond the veil of time spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.