• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. pm modi on rahul gandhi from kerala sabha criticizes congress and other partys od state spl

Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहुल गांधींवर टीका; म्हणाले “युवराजांना आपल्या कुटुंबाची..”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळमधील अलाथूर, पलक्कड येथे सभा पार पडली. या सभेमधून त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

Updated: April 16, 2024 12:19 IST
Follow Us
  • pm modi on rahul gandhi from keral sabha
    1/9

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. (Photo Source- Bharatiya Janata Party (BJP) /Facebook Page)

  • 2/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (१५ एप्रिल) केरळमधील अलाथूर, पलक्कड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. (Photo Source- Bharatiya Janata Party (BJP) /Facebook Page)

  • 3/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उल्लेख ‘युवराज’ असा करत, उत्तर प्रदेशातील जागा वाचवू न शकल्यामुळे ते आता केरळमध्ये आले आहेत, असा टोला लगावला. (संग्रहित फोटो)

  • 4/9

    पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसच्या युवराजांना उत्तर प्रदेशात आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवणे कठीण झाले. त्यामुळे त्यांनी केरळमध्ये आपले नवे तळ बनवले आहे. (Photo Source- Bharatiya Janata Party (BJP)/Facebook Page)

  • 5/9

    काँग्रेसने येथून निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी देशविरोधी कारवायांसाठी बंदी घालण्यात आलेल्या संघटनेसोबत राजकीय चर्चा केली. निवडणुकीत काँग्रेसचे युवराज केरळच्या लोकांकडून मते मागतील. मात्र, येथील जनतेच्या प्रश्नांवर एक शब्दही बोलणार नाहीत”, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. (संग्रहित फोटो)

  • 6/9

    यावेळी मोदींनी डाव्या सरकारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “एलडीएफ-यूडीएफपासून सावधान राहिले पाहिजे. हे केरळची स्थिती बिघडवत आहेत.” (Photo-ANI)

  • 7/9

    पुढे ते म्हणाले, “केरळमधील सत्ताधारी पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या करुवन्नूर को-ऑपरेटिव्ह बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यावर राहुल गांधी काही बोलत नाहीत. हे मला (नरेंद्र मोदी) रोखण्यासाठी भ्रष्ट युती करत आहेत. पण मी त्यांना घाबरत नाही.” (Photo Source- Bharatiya Janata Party (BJP)/Facebook Page)

  • 8/9

    केरळच्या विकासावर काय मांडली भूमिका?
    “केरळमधील नैसर्गिक सौंदर्य सर्वांना भुरळ घालते. केरळमध्ये अनेक मंदिरे आहेत. येत्या पाच वर्षांत आम्ही केरळला महामार्ग, द्रुतगती मार्ग आणि हाय-स्पीड वंदे भारत गाड्यांचे जाळे उभे करु”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (Photo-ANI)

  • 9/9

    हेही पहा- Loksabha Election 2024 : काळा पैसा, ईडी कारवाई ते इलेक्टोरल बॉण्ड, पंतप्रधान मोदी निवडून आल्यावर काय करणार? (Photo-ANI)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsराहुल गांधीRahul Gandhiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Pm modi on rahul gandhi from kerala sabha criticizes congress and other partys od state spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.