• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. abhijeet bichukale satara constituency election fight with udayanraje bhosale spl

Loksabha Election 2024 : साताऱ्यात उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले निवडणूक लढणार; म्हणाले ”मी सातारा हे नाव…”

“मी लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर करतो आहे.” अस बिचुकले म्हणाले आहेत.

April 17, 2024 20:09 IST
Follow Us
  • udayanraje bhosale, nomination, satara lok sabha 2024 election
    1/9

     महायुतीत भाजपाने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली.

  • 2/9

    या जागेवरून आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेही उतरणार आहेत. १९ एप्रिल रोजी ते उमेदवारीचा अर्ज भरणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. (Photo Source- Abhijeet Bichukale/FacebookPage)

  • 3/9

    माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. अभिजीत बिचुकले म्हणाले, “मी एकच गोष्ट सांगतो की मी १९ तारखेला अर्ज भरणारच.” (Photo Source- Abhijeet Bichukale/FacebookPage)

  • 4/9

    ते पुढे म्हणाले “भाजपाकडून तिकीट मिळावं अशी उदयनराजेंची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. पण भाजपावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिलाय याचं आत्मपरीक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे. त्यानंतर लोकांनी त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शक्तिप्रदर्शन काय असतं? शक्ती लोकांनी युद्धात दाखवली पाहिजे. मटण देऊन शक्ती दाखवली जात नाही.” असही ते म्हणाले आहेत. (Photo Source- Abhijeet Bichukale/FacebookPage)

  • 5/9

    “शरद पवार आणि उदयनराजेंचं हाडवैर आहे. मी या सगळ्यांमध्ये एकटा लढतोय त्यामुळे यावेळी मला संधी द्या”, असंही अभिजीत बिचुकले यावेळी म्हणाले. (Photo Source- Abhijeet Bichukale/FacebookPage)

  • 6/9

    “कुठला पक्ष, कुठले नेते, कोण कुणाचे कार्यकर्ते, सतरंज्या उचलणारे आहेत याचं मला काही घेणंदेणं नाही. २००४, २००९, २०१४, २०१९ या चार निवडणुका मी लढवल्या आहेत. माझं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला. साताऱ्याच्या जनतेने २००९ मध्ये मला १२ हजारांहून जास्त मतदान केलं होतं. आताही तसंच मतदान होईल असं मला वाटतं.” असही बिचुकलेंनी सांगितले. (Photo Source- Abhijeet Bichukale/FacebookPage)

  • 7/9

     छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं आहे. संपूर्ण समाज, विविध जाती धर्म यांना एकत्र घेऊन देशाला नवी दिशा आणि दशा द्यायची आहे. (Photo Source- Abhijeet Bichukale/FacebookPage)

  • 8/9

     मी लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर करतो आहे. माझ्या संपूर्ण फॅन्सनी आणि सातारकरांनी माझा विचार करावा. मी सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेलं आहे. मला आता यावेळी दिल्लीत काम करण्याची संधी द्या ” असं बिचुकले काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. (Photo Source- Abhijeet Bichukale/FacebookPage)

  • 9/9

    मागच्या विधानसभा निवडणुकीतही अभिजीत बिचुकले यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. परंतु, तिथून त्यांचं डिपॉजिट जप्त झालं. (Photo Source- Abhijeet Bichukale/FacebookPage)

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Abhijeet bichukale satara constituency election fight with udayanraje bhosale spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.