Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. supriya sule daughter revati son vijay photo in mahavikas aghadi rally in baramati pune amol kolhe dhangekar loksabha nomination svs

सुप्रिया सुळेंच्या लेक व मुलाची पवार विरुद्ध पवार लढतीत एंट्री; महाविकास आघाडीच्या शक्तिप्रदर्शानाचे खास फोटो

Supriya Sule Family In MVA Rally: पवार कुटुंबातील लेकी- सुनांच्या उमेदवारीची चर्चा असताना या फोटोंमधून तरी सुप्रिया यांना सुळे कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळताना दिसतोय.

April 18, 2024 20:33 IST
Follow Us
  • Supriya Sule Daughter Revati Son Vijay Photo in Mahavikas Aghadi Rally in Baramati Pune Amol Kolhe Dhangekar Loksabha Nomination
    1/9

    बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध सुळे असा थेट सामना यंदा पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यातील ही लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे आणि पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर गुरुवारी (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)

  • 3/9

    महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करत शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा सुद्धा आज पार पडली विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांची दोन्ही मुलं म्हणजेच लेक रेवती व मुलगा विजय हे सुद्धा आईच्या प्रचारासाठी सहभागी झाले होते.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)

  • 4/9

    महाविकास आघाडीच्या या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यावर झालेल्या सभेत शरद पवारांसह अमोल कोल्हे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सुषमा अंधारे यासुद्धा उपस्थित होत्या. (फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)

  • 5/9

    यापूर्वी सुद्धा काही मोजक्या प्रचारसभांना सुप्रिया सुळे या आपले पती सदानंद सुळे, लेक रेवती व मुलगा विजय यांच्यासह दिसल्या होत्या.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)

  • 6/9

    यंदाच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील लेकी- सुनांच्या उमेदवारीची चर्चा असताना या फोटोंमधून तरी सुप्रिया यांना सुळे कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळताना दिसतोय.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)

  • 7/9

    जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता सुळे, कोल्हे आणि धंगेकरांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले व त्यानंतर रास्ता पेठ येथे महाविकास आघाडीची सभा झाली होती.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)

  • 8/9

    एकीकडे महाविकास आघाडीने आज लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे तर दुसरीकडे बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी गुरुवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 9/9

    पुणे आणि शिरूर लोकसभेसाठी येत्या १३ मे रोजी तर बारामतीसाठी ७ मे ला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीकडून या तिन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून प्रचार सुरू झाला आहे.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)

TOPICS
अजित पवारAjit Pawarनिवडणूक प्रचारElection Campaignमराठी बातम्याMarathi Newsमहाविकास आघाडीMahavikas Aghadiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Supriya sule daughter revati son vijay photo in mahavikas aghadi rally in baramati pune amol kolhe dhangekar loksabha nomination svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.