• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. aurangabad loksabha elelction candidates mva shivsena ubt mahayuti shinde group spl

Lok Sabha Election 2024 : महायुतीत छ. संभाजीनगर शिंदेंच्या शिवसेनेला, दोन शिवसैनिक भिडणार; तिरंगी लढतीत कोण होईल विजयी?

छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.

Updated: April 20, 2024 22:09 IST
Follow Us
    sandipan bhumre patil vs chandrkant khaire
    छत्रपती संभाजीनगरची (औरंगाबाद) जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेवर त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्याला संधी दिली आहे.
    राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेचं तिकीट दिलं आहे.
    महाविकास आघाडीत छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटाने या मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे.
    लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं तरी महाराष्ट्रात महायुतीचे अनेक मतदारसंघातील उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत.
    राज्यातल्या अनेक जागांवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपात रस्सीखेच चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्यातरी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)च्या जागेचा तिढा सोडवण्यात महायुतीला यश मिळालं आहे.
    त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) दोन शिवसैनिक भिडणार आहेत.
    या मतदारसंघात संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध एमआयएमचे खासदार (छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार) इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
    त्यामुळे आता या तिरंगी लढतीत कोण कोणाला मात देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारं आहे.
    छत्रपती संभाजीनगरमध्ये चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.
TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeऔरंगाबाद (Aurangabad)Aurangabadभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsमहायुतीMahayutiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv Sena

Web Title: Aurangabad loksabha elelction candidates mva shivsena ubt mahayuti shinde group spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.