• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. varsha gaikwad mva candidate in north central mumbai what about bjp spl

उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड मविआच्या उमेदवार; भाजपाचा उमेदवार ठरेना! वाचा काय घडतंय?

Lok sabha Election 2024: मविआकडून उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Updated: April 26, 2024 13:39 IST
Follow Us
  • varsha gaikwad news from mumbai
    1/10

    मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाचा तिढा गेले काही दिवस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसत होता.

  • 2/10

    त्यापैकीच एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आलेल्या आहेत.

  • 3/10

    यावेळी मात्र पूनम महाजन त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपाकडून मौन बाळगण्यात आले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपा खासदार पूनम महाजन यांनी २०१४ व २०१९ मध्ये दोन वेळा विजय मिळवला.

  • 4/10

    मात्र वरिष्ठांची नाराजी, पक्षांतर्गत वाद, तक्रारी आणि सर्वेक्षण अहवाल आदी कारणांमुळे महाजन यांना उमेदवारी घोषित होऊ शकलेली नाही. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी अनेकदा आग्रह करूनही त्यांनी आपल्याला रस नसल्याचे वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. त्यामुळे भाजपाकडून या मतदासंघातील उमेदवार कोण असेल हा प्रश्नच?आहे.

  • 5/10

    सुरुवातीला काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात ख्रिश्चन आणि मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ही मते वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते.

  • 6/10

    मात्र आता वर्षा गायकवाड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उमेदवाराबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे.

  • 7/10

    दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड इच्छुक होत्या. परंतु, या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद झाले.

  • 8/10

    हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला आणि तिथून अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर झाली. यावरून शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी उबाठा गटावर निशाणा साधला होता. ते म्हणाले, “दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते.”

  • 9/10

    सर्व फोटो पूनम महाजन, वर्षा गायकवाड यांच्या फेसबुक खात्यांवरुन साभार.

  • 10/10

    हेही पहा- Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात आज ८ जागांवर मतदान; ‘या’ उमेदवारांचा मतदार करणार फैसला

TOPICS
पूनम महाजनPoonam Mahajanभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsमहायुतीMahayutiमहाविकास आघाडीMahavikas Aghadiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionवर्षा गायकवाडVarsha GaikwadशिवसेनाShiv Sena

Web Title: Varsha gaikwad mva candidate in north central mumbai what about bjp spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.