-
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्त देशभरात प्रचाराच्या तोफा रोजच धडाडत आहेत.
-
कर्नाटकच्या विजापूर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
-
नुकतेच निवडणूक आयोगाने भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना नोटीस पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणातील उल्लेखांबाबत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठं विधान केलं आहे.
-
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ली खूप नैराश्यग्रस्त दिसत आहेत. कदाचित काही दिवसांनी स्टेजवरच ते रडतानाही दिसू शकतील.
-
“आजकाल भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तणावात असल्याचे दिसून हेत आहे. कदाचित काही दिवसांनी ते स्टेजवरच रडूही शकतात”, असे राहूल गांधी म्हणाले.
-
याशिवाय राहुल गांधी पुढे म्हणाले, निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे जसे की, गरीबी, बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लोकांच्या जीवनाशी निगडित या पश्नांवर पंतप्रधान भाष्य करताना दिसत नाहीत.
-
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुळ मुद्द्यावरून लक्ष भकवटून ते चीन किंवा पाकिस्तानवर बोलतात. कधी कधी ते लोकांना थाळ्या बडवायला सांगतात तर कधी कधी ते सभेला उपस्थित लोकांना मोबाइलचा टॉर्च सुरू करून हात उंचवायला सांगतात”, असे राहुल गांधी म्हणाले.
-
मतदानाच्या पहिल्या टप्प्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा “अब की बार ४०० पार” चा नारा हरवला असल्याचे काही काँग्रेस नेते म्हणाले होते. त्याच विधानाचा आधार घेत राहुल गांधी यांनी ही टीका केली.
-
(सर्व फोटो – संग्रहीत आणि राहुल गांधी फेसबुक पेज)
Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींचं पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं विधान; म्हणाले…
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्नांवर भाष्य करताना दिसत नाहीत.” असेही राहूल गांधी म्हणाले.
Web Title: Rahul gandhi big statement on prime minister narendra modi loksabha election news today spl