-
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिराळा, कामेरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल रात्री जाहीर सभा पार पडली.
-
यावेळी उमेदवार माने यांच्यासह सत्यजित देशमुख, निशीकांत पाटील, सदाभाऊ खोत, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
-
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.
-
मुख्यमंत्री म्हणाले, “काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा जन्म कट, कमिशन आणि करप्शनसाठी झाला. त्यांच्याकडे अजेंडा नाही, नियत नाही आणि नेतासुद्धा नाही. मोदीजींवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही.”
-
“संविधान बदलणार असा खोटा प्रचार आणि संभ्रम पसरवण्याचे काम विरोधांकडून केले जात आहे, कारण त्यांना पराभव दिसतोय.” असे ते म्हणाले.
-
“ज्यांना खोक्याशिवाय झोप येत नाही, उठता बसता खोके पुरत नाहीत त्यांना कंटेनर लागतात, असे लोक बोलतात. कंटेनर कुठून कुठे पोहोचले हे हळूहळू बाहेर येईल”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
-
“शिवसेना-भाजपाच्या पवित्र युतीला डाग लावण्याचे काम ज्यांनी केले त्यांना सडेतोड उत्तर देऊन कसलीही पर्वा न करता काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आपण सोडवली.”, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
-
बाळासाहेब म्हणायचे किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बना परंतु त्यांच्या वारसांना सत्तेची हाव सुटली. हातचे सगळे घालवले, सोन्यासारखी माणसे गेली, पक्ष गेला. मात्र आपण सत्ता, खुर्चीसाठी कधीही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर तडजोड करणार नाही”, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
-
(सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे, फेसबुक पेज)
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर टीका! म्हणाले, “काँग्रेसच्या…”
हातकणंगलेतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचे पहायला मिळाले.
Web Title: Cm eknath shinde criticizing the india and uddhav thackeray in the meeting hatkanangale spl