• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. ncp sharad pawar on ajit pawar and opposition latest statement in baramati speech spl

“…त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोन दिवसात करू शकतो” शरद पवारांचा विरोधकांना इशारा

सत्तेची हवा डोक्यात गेलेल्यांनी जर दमदाटी करायचा प्रयत्न केला तर त्यांना दोन दिवसात जागा दाखवू, असं शरद पवार म्हणालेत.

Updated: May 6, 2024 14:25 IST
Follow Us
    sharad pawar news
     “ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, ते लोक तुम्हाला दमदाटी करत असतील. मात्र, तुम्ही चिंता करू नका. शरद पवार कायम तुमच्या पाठीशी राहील.”
    “कोणी सत्तेचा गैरवापर केला, तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोन दिवसांत करू शकतो, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधकांना प्रचार सांगता सभेत इशारा दिला.”
    शरद पवार यांनी भोर, इंदापूर आणि बारामती येथे जाहीर सभा घेतल्या.
    लोकसभा निवडणुकांसाठीची यंदाची ही बारामतीमधील शेवटची सभा आहे, आपण दरवर्षी शेवटची सभा ज्या प्रांगणात घेतो, ती जागा यंदा सत्ताधाऱ्यांनी ताब्यात घेतली. पण, कुणी जागा अडवली म्हणून आपले काही नुकसान होऊ शकत नाही. अशी टीका त्यांनी अजित पवार गटावर केली.
    सातत्याने भाषण केल्याने घसा बसला असतानाही आणि तोंडातून शब्द फुटत नसतानाही पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीमधील सभेत काही वेळ भाषण केले. त्यांनी भाषण आटोपते घेताच, उपस्थितांनी पवारांचा जयघोष केला. 
    “बारामतीमधील सभेत सुप्रिया सुळे यांनी गेल्या दहा वर्षांत मी काहीच काम केले नाही, हा आरोप मला मान्य नाही. मात्र, या आरोपांना मी फार उत्तर देणार नाही, कारण सत्य त्यांनाही माहिती आहे.” असे ते म्हणाले.
    येत्या सात तारखेला बारामतीकरांच्या सेवेची संधी देण्यासाठी पुन्हा चौथ्यांदा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
    सर्व फोटो शरद पवार या फेसबुक पेजवरून साभार.
    हेही पहा- “पण रणजीतचं; कोणीही वाकडं..” माढ्यातील सभेतून देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी; शरद पवारांना लगावला टोला
TOPICS
अजित पवारAjit PawarबारामतीBaramatiमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionशरद पवारSharad Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Ncp sharad pawar on ajit pawar and opposition latest statement in baramati speech spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.