• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. chief minister eknath shinde on that statement of vijay wadettiwar latest news spl

विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ विधानाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून समाचार; म्हणाले “काँग्रेसचा हात पाकिस्तान..”

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. (सर्व फोटो एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार या फेसबुक पेजवरुन साभार.)

May 7, 2024 16:23 IST
Follow Us
  • Chief Minister eknath Shinde on that statement of Vijay Wadettiwar
    1/10

    “मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे यांना कसाबने गोळ्या घातल्या नव्हत्या तर आरएसएससी संबधित एका पोलिस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या.”

  • 2/10

    “ही माहिती ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवली होती”, असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. 

  • 3/10

    त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

  • 4/10

    “विजय वडेट्टीवार यांचं डोकं फिरलं असून काँग्रेसका हात पाकिस्तान के साथ”, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

  • 5/10

    मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
    “मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. याचे दु:ख काँग्रेसला नाही. कसाबच्या बिर्याणीमुळे अपमान झाल्याचेही ते म्हणाले. यांना कसाबच्या अपमानाची चिंता होती. मात्र, ज्या निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला त्याचे दु:ख काँग्रेसला नाही.

  • 6/10

    “वडेट्टीवार यांचं हे विधान दुर्देवी आणि शहिदांचा आपमान करणारं आहे. त्यामुळे या अपमानाचा बदला देशवासीय घेतल्याशिवाय राहणार नाहीत.”

  • 7/10

    “२६/११ च्या दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी अपेक्षा होती की, याचा बदला घेतला जाईल. मात्र, तेव्हा मोदी पंतप्रधान नव्हते”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • 8/10

    “नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर पुलवामाचा बदला सर्जिकल स्ट्राइक करुन घेतला. मोदींनी दाखवून दिले की, भारत मजबूत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांना मते मागण्याचा अधिकार नाही. आता भारतीय जनात पक्षाने केलेल्या जाहीरातीमध्ये तुमच्या मताचा जल्लोष कुठे व्हायला हवा भारतात की पाकिस्तानात? यामध्ये काँग्रेसचे कुठेही नाव घेतले नाही. असे असताना तक्रार करण्याची गरज काय? काँग्रेसने एवढं मनाला लावून घेण्याचे कारण काय? याचा अर्थ चोराच्या मनात चांदणं. खरं तर काँग्रेस हे पाकिस्तान धार्जिणं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचं हे विधान दुर्देवी असून काँग्रेसची पाकिस्तान धार्जिणी भूमिका देशाला परवडणारी नाही”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

  • 9/10

    मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “काँग्रेसचा हात पाकिस्तानच्या बरोबर आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जेव्हा-जेव्हा काँग्रेस जिंकते तेव्हा-तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. जेव्हा-जेव्हा भारताचा क्रिकेटमध्ये पराभव होतो, तेव्हा पाकिस्तानमध्ये फटाके फुटतात. काँग्रेसचे सरकार अनेक वर्ष मूग गिळून गप्प होतं. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, घर में घुसकर मारेंगे”, असे शिंदे म्हणाले.

  • 10/10

    आरएसएसच्या नसानसात राष्ट्रभक्ती
    विजय वडेट्टीवार यांनी उज्जव निकम यांच्यावर केलेल्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आज काँग्रेसच्या बरोबर जे आहेत ते यावर गप्प बसले आहेत. काँग्रेसच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसायला यांना (उद्धव ठाकरे यांना) थोडंही काही वाटत नाही. उद्धव ठाकरे यांचे नकली हिंदुत्व आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर यांना चांगलं धू-धू धूतलं असतं. त्यांच्या या विधानाचा निषेध करावा एवढा कमी आहे. विजय वडेट्टीवार यांचं डोकं फिरलं आहे. ते आरएसएसची भाषा करतात. मात्र, आरएसएसच्या नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली असते”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeकाँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionविजय वडेट्टीवारVijay WadettiwarशिवसेनाShiv Sena

Web Title: Chief minister eknath shinde on that statement of vijay wadettiwar latest news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.