-
सोशल मीडियावर अनेकदा बॉलिवूड स्टार्सपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टार किड्सची चर्चा रंगत असते. यामध्ये अनन्या पांडे, आलिया भट्ट,रणबीर कपूर हे स्टारकिड्स कायमच चर्चेत असतात. मात्र, काही स्टारकिड्स आहेत ज्यांनी बॉलिवूडला पाठ दाखवत दुसऱ्या क्षेत्रात आपलं नशिब आजमावलं आहे. जाणून घेऊया त्या स्टारकिड्स बद्दल…
-
अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा ही देखील चित्रपटसृष्टी पासून लांब आहे. तिने 'लॉरियल' या ब्रॅंडसाठी मॉडलिंग केली असून 'नेक्स्ट जेन टॉक शो' देखील होस्ट केला आहे. श्वेता बच्चनचं स्वत:च कपड्यांच एक ब्रँड आहे.
-
दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी रझदान यांची मुलगी शाहीन भट्टने अभिनय न करता बॅक स्टेजवर काम करण्याचे ठरवले. 'सन ऑफ सरदार' या चित्रपटात तिने सह- लेखिका (को-राइटर) म्हणूनही काम केले आहे. शाहीनने लंडनमध्ये फिल्म मेकिंगचा अभ्यास केला आहे.
-
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री न करण्याचे ठरवले आहे. आजतक ने दिलेल्या वृत्तानुसार नव्याने तिच्या वडीलांसोबत म्हणजेच निखिल नंदा सोबत व्यवसाय करण्याचा विचार केला आहे.
-
अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी अहाना देओल ही अभिनय क्षेत्रात नसून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. ती एक प्रोफेशनल ओडिसी डांसर आहे.
-
अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा गुप्ता तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. 'हाऊस ऑफ मसाबा' असे तिच्या कपड्यांच्या ब्रॅंडचे नाव आहे. या आधी मसाबाने नेटफ्लिक्सवरील 'मसाबा मसाबा' या वेब सीरिजमध्ये आई नीना गुप्तासोबत काम केले आहे.
-
अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तर त्यांची दुसरी मुलगी रिया कपूर बद्दल अनेकांनी ऐकले आहे. रिया फॅशन स्टायलिस्ट सोबत चित्रपट निर्माता देखील आहे.
-
पतौडी कुटूंबातील सैफ अली खान आणि सोहा अली खान यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना एक बहिन असून सबा अली खान असे तिचे नाव आहे. तिच्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. सबा सुप्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे.
-
दिवंगत अभिनेता ऋषि कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर साहनी ही ज्वेलरी डिझायनर आहे. रिद्धिमा चित्रपटसृष्टी पासून लांब असली तरी ती नेहमीच चर्चेत असते.
-
दिग्दर्शक राकेश रोशन यांची मुलगी आणि अभिनेता हृतिक रोशनची बहिन सुनैना अनेक वेळा चर्चेत असते. सुनैना त्यांच्या कुटूंबाचे प्रोडक्शन हाऊस 'फिल्मक्राफ्ट' सांभाळते.
-
दिग्दर्शक बोनी कपूर यांची मोठी मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहिन अंशुला कपूर ही सिनेसृष्टी पासून लांब आहे. तिने आधी गुगलमध्ये काम केले असून त्यानंतर हृतिक रोशनच्या HRX या ब्रॅंडमध्ये ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम केले आहे.
-
आलिया, पूजा आणि शाहीन व्यतिरिक्त महेश भट्ट यांचा आणखी एक मुलगा आहे. त्याचे नाव राहूल भट्ट आहे. राहुल एक फिटनेस प्रशिक्षक आहे. 'दंगल' चित्रपटासाठी राहुलने आमिर खानला प्रशिक्षण दिले होते.
या स्टारकिड्सनी बॉलिवूडमध्ये नाही तर दुसऱ्या क्षेत्रात निर्माण केली स्वत:ची ओळख
Web Title: This are the star kids who chose not to be an actor and actress dcp