• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from alia bhatt to deepika padukon bollywood actresses who charged more fees for movies that male co actors photos kak

Photos : आलिया ते दीपिका…’या’ बॉलीवूड अभिनेत्री चित्रपटासाठी घेतात अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन

बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांना चित्रपटांसाठी अभिनेत्यांपेक्षाही जास्त मानधन मिळाले आहे.

Updated: March 24, 2022 12:55 IST
Follow Us
  • deepika padukon
    1/21

    प्रत्येक क्षेत्रात महिलांनी कर्तृत्वाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करून दाखवलं आहे. यात कलाक्षेत्रातील अभिनेत्रीही मागे राहिलेल्या नाहीत. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण / फेसबुक)

  • 2/21

    बॉलिवूडमधील कलाकारांचे मानधन हा नेहमीच उत्सुकता आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर / फेसबुक)

  • 3/21

    परंतु बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांना चित्रपटांसाठी अभिनेत्यांपेक्षाही जास्त मानधन मिळाले आहे. (फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / फेसबुक)

  • 4/21

    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारून तिच्या अभिनयाची जादू दाखवून दिली. (फोटो सौजन्य : आलिया भट / फेसबुक)

  • 5/21

    ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील आलियाने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं. (फोटो सौजन्य : आलिया भट / फेसबुक)

  • 6/21

    आलियाची ‘राझी’ चित्रपटातील भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

  • 7/21

    या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने आलियाच्या पतीची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

  • 8/21

    या भूमिकेसाठी आलियाने १० करोड रुपये इतके मानधन घेतले होते. तर विकी कौशलने तीन-चार करोड रुपये मानधन घेतले होते.(फोटो सौजन्य : आलिया भट / फेसबुक)

  • 9/21

    बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

  • 10/21

    ‘कि अ‍ॅण्ड का’ या चित्रपटासाठी करीनाने अभिनेता अर्जुन कपूरपेक्षा जास्त मानधन घेतले होते. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

  • 11/21

    बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनयासोबतच तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर / फेसबुक)

  • 12/21

    श्रद्धाने ‘स्त्री’ या चित्रपटासाठी अभिनेता राजकुमार रावपेक्षा जास्त मानधन घेतले होते. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर / फेसबुक)

  • 13/21

    अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.(फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण / फेसबुक)

  • 14/21

    दीपिकाने वेगवेगळ्या भूमिका साकारून अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण / फेसबुक)

  • 15/21

    एका चित्रपटासाठी दीपिका जवळपास २६ करोड रुपये इतके मानधन घेते. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण / फेसबुक)

  • 16/21

    ‘पद्मावत’ या चित्रपटासाठी तिने १२ करोड रुपये मानधन घेतले होते. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

  • 17/21

    अभिनेता रणवीर सिंगने या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनापेक्षा ही रक्कम जास्त होती. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

  • 18/21

    बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. (फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / फेसबुक)

  • 19/21

    माधुरी दीक्षितने ९०च्या दशकात अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. (फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / फेसबुक)

  • 20/21

    ‘हम आपके है कौन’ हा तिचा गाजलेला चित्रपट. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

  • 21/21

    या चित्रपटासाठी माधुरीने अभिनेता सलमान खानपेक्षा जास्त मानधन घेतले होते. (फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / फेसबुक)

TOPICS
आलिया भट्टAlia Bhattदीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixit

Web Title: From alia bhatt to deepika padukon bollywood actresses who charged more fees for movies that male co actors photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.