-
अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर सध्या त्यांच्या आगामी ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
-
या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अक्षय-मानुषी वाराणसी येथे पोहोचले.
-
चित्रपटाला यश मिळावं आणि प्रमोशनचा भाग म्हणून त्यांनी वाराणसी येथे हजेरी लावली.
-
यावेळी त्यांनी गंगाआरती केली.
-
त्यानंतर काशी येथील मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं.
-
यादरम्यानचे दोघांचे व्हिडीओ तसेच फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
-
तसेच अक्षय-मानुषीने बोटीने देखील प्रवास केला.
-
अक्षयने तर गंगेमध्ये उडीदेखील मारली.
-
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय-मानुषी दोघंही खूप मेहनत घेत आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : ‘पृथ्वीराज’च्या यशासाठी अक्षय कुमार करतोय देवदर्शन, गंगा आरतीदरम्यानचे फोटो व्हायरल
अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अक्षय या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री मानुषी छिल्लरसह वाराणसी इथे पोहोचला. यावेळी त्याने गंगाआरती देखील केली. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अक्षयने देवदर्शन केलं आहे. यादरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
Web Title: Actor akshay kumar to attend shrikashi vishwanath darshan and ganga aarti in varanasi kmd