• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kartik aaryan blockbuster bollywood movie bhool bhulaiyaa 2 vs akshay kumar samrat prithviraj box office collection photos kak

Photos : कार्तिकच्या ‘भूल भूलैय्या २’ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटापेक्षा तिप्पट कमाई

‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या तुलनेत ‘भूल भूलैय्या २’ वरचढ ठरला आहे.

June 10, 2022 16:26 IST
Follow Us
  • Samrat Prithviraj vs Bhool Bhulaiyaa 2
    1/18

    बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेला ‘भूल भूलैय्या २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.

  • 2/18

    ‘भूल भूलैय्या’चा सिक्वेल असलेला हा चित्रपट २० मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला.

  • 3/18

    प्रदर्शनाच्या २१ दिवासांनंतरही बॉक्स ऑफिसवर ‘भूल भूलैय्या २’ चित्रपटाची जादू कायम आहे.

  • 4/18

    कार्तिक आणि कियाराला पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करताना दिसत आहेत.

  • 5/18

    तर दुसरीकडे बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाला मात्र प्रेक्षकांची फारशी पसंती मिळत नसल्याचं दिसत आहे.

  • 6/18

    ३ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’चे शो चित्रपटगृहात प्रेक्षक नसल्याने अनेक ठिकाणी रद्ददेखील करण्यात आले आहेत.

  • 7/18

    याच चित्रपटातून ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

  • 8/18

    ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची बरीच चर्चा रंगली होती.

  • 9/18

    परंतु, अपेक्षेला खरा न उतरल्यामुळे चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

  • 10/18

    पहिल्याच दिवशी जवळपास फक्त ११ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले.

  • 11/18

    त्यानंतर विकेण्डला चित्रपटाचे शो हाऊसफुल होतील असे वाटले होते.

  • 12/18

    परंतु, विकेण्डलादेखील हा चित्रपट फारसा चालला नाही.

  • 13/18

    याउलट ‘भूल भूलैय्या २’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १४.११ कोटींची कमाई केली होती.

  • 14/18

    दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ होताना दिसत आहे.

  • 15/18

    अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या तुलनेत ‘भूल भूलैय्या २’ वरचढ ठरला आहे.

  • 16/18

    ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाने आत्तापर्यंत ५५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

  • 17/18

    ‘भूल भूलैय्या २’ चित्रपटाने ‘सम्राट पृथ्वीराज’पेक्षा तिप्पटीने कमाई केली आहे.

  • 18/18

    बॉक्स ऑफिसवर ‘भूल भूलैय्या २’ चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण १६३.०३ कोटींचा गल्ला जमवला आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
अक्षय कुमारAkshay Kumarकार्तिक आर्यनKartik AaryanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kartik aaryan blockbuster bollywood movie bhool bhulaiyaa 2 vs akshay kumar samrat prithviraj box office collection photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.