-
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणाबाबत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
-
अभिनेते शक्ती कपूर यांचा हा लेक अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे.
-
मात्र त्याच्या फिल्मी करिअरमध्ये बरेच चढ-उतार आले.
-
सिद्धांतने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. ‘भुल भूलैय्या’, ‘भागम भाग’, ‘चुप चुपके’, ‘ढोल’ सारख्या चित्रपटाचं त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं.
-
‘शूट आऊट एट लोखंडवाला’ हा त्याचा अभिनेता म्हणून पाहिला चित्रपट.
-
नंतर सिद्धांतने ‘हसीना पारकर’, ‘जज्बा’, ‘पलटन’, ‘यारम’, ‘हॅलो चार्ली’, ‘भूत-पार्ट वन: द हॉन्टेड शिप’, ‘चेहरे’ सारख्या चित्रपटामध्ये त्याने काम केलं.
-
पण अभिनेता म्हणून त्याला यश मिळालं नाही.
-
बऱ्याचदा तो सहाय्यक अभिनेत्याचीच भूमिका करताना दिसला.
-
वडील शक्ती कपूर यांच्यासारखं नाव कमावण्यात सिद्धांत अपयशी ठरला. ‘चेहरे’ हा त्याचा शेवटचा चित्रपट. सध्यातरी त्याच्या हाती कोणताच चित्रपट नाही. (फोटो – इन्स्टाग्राम)
ड्रग्ज प्रकरणात अडकलेला शक्ती कपूर यांचा लेक अभिनयातही सुपरफ्लॉप, आता नेमकं करतो तरी काय?
बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूर (Siddhanth Kapoor) मोठ्या अडचणीत सापडला आहे. ड्रग्ज घेतल्याच्या आरोपखाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का? अभिनयक्षेत्रातही त्याने फारशी उत्तम कामगिरी केलेली नाही. याचबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: Who is siddhanth kapoor and child of shakti kapoor arrest for drugs case flop filmy career kmd