-
अभिनेता हृतिक रोशनची शरीरयष्टी पाहून तो फिटनेस त्याच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं. फक्त हृतिकलाच फिटनेसचं वेड नाही तर त्याची आई पिंकी रोशनही तितकीच फिटनेस प्रेमी आहे.
-
जागतिक योग दिनाच्यानिमित्ताने चक्क पाण्यामध्ये त्यांनी योगासनांचे प्रकार केले.
-
हृतिकची आई पिंकी यांचं वय ६७ वर्ष आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे.
-
योग दिनाच्यानिमित्ताने पिंकी यांनी विविध प्रकारची योगासनं करतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत.
-
हृतिकला फिटनेससाठी प्रेरणा बहुदा त्याच्या आईकडूनच मिळाली असावी.
-
बऱ्याचदा पिंकी फक्त योगासने किंवा व्यायामप्रकार नव्हे तर बॉक्सिंग करतानाही दिसतात.
-
तरुणांना लाजवणारी त्यांची एनर्जी आणि फिटनेससाठीचं प्रेम खरंच कौतुकास्पद आहे.
-
नेहमीच पिंकी सोशल मीडियाद्वारे वर्कआऊट, योग तसेच विविध व्यायाम प्रकार करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात.
-
सध्या पिंकी यांच्या फिटनेसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : हृतिक रोशनच्या ६७ वर्षीय फिटनेस प्रेमी आईला पाहिलंत का?
अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन या फिटनेस प्रेमी आहेत. जागतिक योगदिनाच्यानिमित्ताने त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फोटो शेअर केले आहेत. यावरच आज आपण एक नजर टाकणार आहोत.
Web Title: Hrithik roshan 67 year old mother pinkie share photos of yoga poses on international yoga day 2022 kmd