-
बॉलीवूडमध्ये असे अनेक सुपरहिट सिनेमे आहेत ज्यांचे सिक्वेलही खूप पसंत केले गेले. त्याचबरोबर, असेही काही चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले, परंतु चाहत्यांना त्यांचा सीक्वल हवा आहे. चला तर मग अशा चित्रपटांवर एक नजर टाकूया (फोटो: स्क्रीन ग्रॅब)
-
तुंबाड बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण जेव्हा हा चित्रपट OTT वर आला तेव्हा लोकांना समजलं की हा चित्रपट अप्रतिम आहे. (फोटो: स्क्रीन ग्रॅब)
-
आता प्रेक्षक तुंबाडच्या सीक्वेलची वाट पाहत आहेत.(फोटो: स्क्रीन ग्रॅब)
-
अभय देओल स्टारर ओए लकी लकी ओए बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. मात्र तरीही लोक सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक करताना आणि सिक्वेलची मागणी करताना दिसत आहेत. (फोटो: स्क्रीन ग्रॅब)
-
ढोल प्रतर्शित झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नव्हता. हा चित्रपट यूट्यूबवरही आहे. यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक त्याच्या सिक्वेलची मागणी करताना दिसतात.(फोटो: स्क्रीन ग्रॅब)
-
नायक : अनिल कपूरचा नायक हा चित्रपट फ्लॉप ठरला होता, पण तो टीव्हीवर मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. तसेच प्रेक्षकांनाही आवडला होता. लोक या चित्रपटाचा सिक्वेलची मागणी करताना दिसतात. (फोटो: स्क्रीन ग्रॅब)
-
तमाशा : रणबीर कपूर आणि दीपिका पदूकोनच्या ‘तमाशा’नेही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नव्हती. परंतु लोक या चित्रपटाच्या सीक्वललाही मागणी दिसतात. (फोटो: स्क्रीन ग्रॅब)
फ्लॉप ठरूनही चाहत्यांना ‘या’ चित्रपटांच्या सिक्वेलची प्रतीक्षा
तुंबाड बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण जेव्हा हा चित्रपट OTT वर आला तेव्हा लोकांना समजलं की हा चित्रपट अप्रतिम आहे.
Web Title: Tumbaad dhol to anil kapoor naayak fans waiting for these flop bollywood movies sequel jshd import asc