-
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
-
आपल्या कामाच्या जोरावर मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता वैयक्तिक आयुष्यातही चांगलीच प्रगती करत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःचं घर घेतलं. तर आता त्या घरामध्ये तिने गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा केली.
-
प्राजक्ताने आज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या पूजेचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
जरीचा घागरा परिधान करून तिने स्वतः त्या घरात वास्तुपूजा आणि सत्यनारायणाची पूजा केली.
-
तर तिच्या कुटुंबीयांनी एकत्र या नव्या घरात गृहप्रवेशही केला.
-
पूजा झाल्यानंतर आरती करताना तिने शंखही फुंकला.
-
या पूजेचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये प्राजक्ताने ड्रीम होम, न्यू होम, वास्तुपूजा, सत्यनारायण असे हॅशटॅग वापरले.
-
आता तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आले असून यावर कमेंट करून तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत तिला शुभेच्छा देत आहेत.
प्राजक्ता गायकवाडने केला तिच्या नव्या घरात गृहप्रवेश, पाहा खास झलक
प्राजक्ता गायकवाडने स्वतःचं घर खरेदी केलं आहे.
Web Title: Prajakta gaikwad shared a photos of gruhapravesh pooja of her new home rnv