Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress priya bapat talked about her fitness secret how she keeps herself healthy rnv

तंदुरुस्त आरोग्य अन् नितळ त्वचा; प्रिया बापटने उघड केलं रहस्य, म्हणाली…

‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये तिने ती स्वतःच्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी कशी घेते हे सांगितलं आहे.

May 29, 2023 18:49 IST
Follow Us
  • प्रिया बापट ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्षं ती मालिका, नाटक, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
    1/12

    प्रिया बापट ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्षं ती मालिका, नाटक, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

  • 2/12

    मराठीनंतर हिंदी मनोरंजन सृष्टीतदेखील तिने तिची स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

  • 3/12

    तिच्या कामाबरोबरच ती तिच्या फिटनेसमुळेही नेहमीच चर्चेत असते आणि आता तिने तिच्या निरोगी आरोग्याचं रहस्य सांगितलं आहे.

  • 4/12

    प्रिया सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सिरीजमुळे खूप चर्चेत आहे.

  • 5/12

    नुकताच या सिरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिरिजच्या टीझर आणि ट्रेलरवर कमेंट करत अनेक चाहत्यांनी प्रियाला “तू चार वर्षांपूर्वी जशी दिसायची तशीच आताही दिसतेस,” असं म्हटलं.

  • 6/12

    याचं गुपित आता प्रियाने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये उघड केलं आहे.

  • 7/12

    ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत फिटनेसबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, “मला व्यायाम करायला आवडतो आणि मी तो रोज न चुकता करते.”

  • 8/12

    “स्किन एजिंग लवकर होईल अशा कुठल्याही सवयी मला नाहीत.”

  • 9/12

    “मला बाहेरचं खाणं आवडत नाही आणि अगदीच जर कधी बाहेर जेवायला गेलो तर मी सूप, सॅलेड असंच काहीतरी खाते.”

  • 10/12

    “त्यामुळे भरपूर पाणी पीणं, घरचं खाणं आणि वेळेवर खाणं हे मी फॉलो करत असते.”

  • 11/12

    “पण काही गोष्टी या अनुवांशिकरित्या आपल्याला मिळतात आणि त्या टिकवून त्याचं सोनं करणं आपल्या हातात असतं जे मी करण्याचा प्रयत्न करते.”

  • 12/12

    आता प्रियाचा हा फिटनेस फंडा चर्चेत आला आहे.

TOPICS
प्रिया बापटPriya BapatमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actress priya bapat talked about her fitness secret how she keeps herself healthy rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.