-
‘स्वामिनी’, ‘अग्गंबाई सूनबाई’, ‘योग योगेश्वर जयशंकर’ या मालिकांमधून अभिनेत्री उमा पेंढारकर प्रेक्षकांच्या भेटीला आली.
-
काही दिवसांपूर्वीच ती मनोरंजन विश्वापासून दूर जाऊन न्यूझीलंडला राहायला गेली आहे.
-
तिचा नवरा तिथे स्थायिक असतो.
-
तर आता ती तिच्या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
-
आता यूट्यूब चॅनलच्या एका व्हिडीओमधून तिने आपला चेहरा नितळ कसा ठेवायचा यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
-
ती म्हणाली की, “जर तुम्हाला ग्लोइंग आणि पिंपल फ्री त्वचा हवी असेल तर रोज रात्री झोपताना हळद दूध प्यायचं.”
-
“पण हळदीबरोबरच त्या दुधामध्ये एक चमचा गाईचं शुद्ध तूप घालायचं.”
-
“चवीला हे फारसं छान लागणार नाही पण याचा तुमची त्वचा चांगली ठेवण्यासाठी निश्चितच खूप उपयोग होईल.”
-
“तर याबरोबरच रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी प्यायचं.”
-
“याचा वजन कमी करण्यासाठी किती उपयोग होईल हे मी खात्रीने सांगू शकत नाही.”
-
“पण चेहऱ्यावर एक चमक आणण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.”
-
तर आता तिने शेअर केलेला हा व्हिडीओ चर्चेत आला असून त्यावर कमेंट करत तिचे चाहते तिला यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.
“चेहरा नितळ आणि पिंपल फ्री ठेवण्यासाठी दुधात मिसळा…”, लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दिल्या सोप्या घरगुती टिप्स, घ्या जाणून
यूट्यूब चॅनलच्या एका व्हिडीओमधून तिने आपला चेहरा नितळ कसा ठेवायचा यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
Web Title: Marathi actress uma pendharkar gave simple tips for glowing and pimple free skin rnv