-
Ira Khan Nupur Shikhare Wedding: आमिर खानची लाडकी लेक आयरा खान ३ जानेवारी म्हणजेच आज बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत मराठमोळ्या पद्धतीने लग्न करणार आहेत. दोघेही मुंबईत कोर्ट मॅरेज करणार असून कोर्ट मॅरेजनंतर मुंबईतील ताज हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टी होणार आहे. या पार्टीसाठी सुमारे ९०० लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
-
आयरा आणि नुपूर शिखरे आज विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, कोर्ट मॅरेजनंतर ८ जानेवारीला हे जोडपे रीतिरिवाजानुसार लग्न करणार आहेत. दरम्यान लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना आमिर खानच्या लेकीनं आयराने खास विनंती केली आहे.
-
बऱ्याच काळापासून, हे जोडपे त्यांच्या नात्यामुळे चर्चेत होते आणि आता अखेरीस ते सात जन्माची साथ देण्याचे वचन एकमेकांना देणार आहेत.
-
८ जानेवारीला लग्न झाल्यानंतर १३ जानेवारीला मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयरा आणि नुपूर शिखरे यांच्या ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.
-
यावेळी आयराने तिच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना भेटवस्तू आणू नयेत अशी विनंती केली आहे.
-
आयरा म्हणते की मला भेटवस्तू देण्याऐवजी लग्नाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांनी माझ्या एनजीओला देणगी द्यावी.
-
आयरा खान ‘अगत्सु फाउंडेशन’ नावाचं एनजीओ चालवते. या फाउंडेशनच्या ती माध्यमातून मानसिक आरोग्य समर्थन, शरीर जागरूकता कार्यक्रम आणि आत्म-साक्षात्कार यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते.
-
(सर्व छायाचित्रे: इरा खान इन्स्टाग्राम)
Ira Khan Wedding: आमिरच्या लेकीनं लग्नाला येणाऱ्या वऱ्हाड्यांकडे केली ‘ही’ खास मागणी
Ira Khan Nupur Shikhare Wedding : लग्न घटिका समीप आली! आमिर खानची लेक आज अडकणार लग्नबंधनात, ९०० जणांना आमंत्रण
Web Title: Ira khan wedding aamir khan daughter demand special gift from guests of her marriage with nupur shikhare jshd import srk