-
‘बिग बॉस ओटीटी’चे तिसरे पर्व आता लवकरच सुरू होणार आहे.
-
‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये सहभाग घेणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.
-
माहितीनुसार, ‘कुछ कुछ होता है’ मध्ये शाहरुख खानच्या मुलीची भूमिका साकारणारी सना सईद यात सहभाग घेणार आहे.
-
‘बिग बॉस-१७’ चा स्पर्धक विकी जैनचं नावही चर्चेत आहे.
-
सुरभी ज्योति, गायक श्रीराम चंद्रा, सोनिया सिंग हे कलाकारसुद्धा या स्पर्धेत उतरणार असल्याची चर्चा आहे.
-
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दलजीत कौर, शीजान खान, आर्यांशी शर्मा या स्पर्धकांच्या नावाचाही यात समावेश आहे.
-
यूट्यूबर रोहित झिंजुर्के, सागर ठाकुर हे युट्यूबरही या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
-
हर्ष बेनीवाल, रोहित खत्री, महेश केशवाला असे अनेक युट्यूबर या स्पर्धेत दिसण्याची शक्यता आहे.
-
दरम्यान, या यादीत आणखी नावेही जोडली जाणार आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’ च्या तिसऱ्या पर्वाची सुरूवात मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. (All Photos- Social Media)
PHOTOS: शाहरुख खानच्या मुलीपासून ते विनोदी कलाकार आणि युट्यूबर्सपर्यंत; जाणून घ्या ‘बिग बॉस ओटीटी-३’च्या स्पर्धकांची यादी
‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये सहभाग घेणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.
Web Title: Bigg boss ott season 3 contestants sana saeed surbhi jyoti harsh beniwal see photos dvr