• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mothers day wishes from marathi celebrities swapnil joshi rinku rajguru gaurav more siddharth chandekar and others on social media dvr

Mothers Day: स्वप्नील जोशी, रिंकू राजगुरू ते गौरव मोरे; ‘या’ मराठमोळ्या कलाकारांनी दिल्या मातृदिनानिमित्त त्यांच्या आईला खास शुभेच्छा, पाहा PHOTOS

श्रुती मराठे, सना शिंदे, मृणाल दुसानीस असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आज त्यांच्या आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

May 12, 2024 14:44 IST
Follow Us
  • Mothers Day wishes from marathi celebrities on social media
    1/21

    आज (१२ मे २०२४ रोजी) सर्वत्र मातृदिन साजरा केला जातोय. आईचा असा काही एक दिवस नसतो, आई नेहमीच आपल्याबरोबर असते. आपल रक्षण करत असते, आपली काळजी घेत असते. पण या ३६५ दिवसांत ती नेहमीच आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या विचारात एवढी गुंतलेली असते की तिचं स्वत:कडे दुर्लक्ष होतं. अशा या प्रेमळ मातांसाठी आजचा हा एक खास दिवस आपण साजरा करतो. या दिवशी अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 2/21

    भार्गवी चिरमुलेनेदेखील तिच्या आईबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 3/21

    पूजा सावंतनेदेखील तिच्या आईचा आणि सासूबाईंचा फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 4/21

    नुकतीच भारतात परत आलेली अभिनेत्री, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ फेम मृणाल दुसानीसनेदेखील तिच्या आईला मातृदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 5/21

    ‘काहे दिया परदेस’ फेम ऋषि सक्सेना त्याच्या इन्स्टाग्रामवर आईबरोबरचा फोटो शेअर करत तिला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 6/21

    लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीनेदेखील त्याच्या सोशल मीडियावर आईबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

  • 7/21

    ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायिका कार्तिकी गायकवाडनेदेखील तिच्या आईबरोबरचा फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 8/21

    लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वेनेदेखील तिच्या लग्नातला आईबरोबरचा खास क्षण जपणारा फोटो शेअर केला आहे.

  • 9/21

    ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेता अमित भानुशालीने त्याच्या आईबरोबरचा फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 10/21

    श्रुती मराठेनेदेखील तिच्या आईबरोबरचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • 11/21

    अभिनेत्री श्रेया बुगडेनेदेखील आईबरोबरचा सुंदर फोटो शेअर करत तिला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 12/21

    नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘नाच गं घुमा’ याची लेखिका आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णीनेदेखील “मातृत्व आणि मी” असं कॅप्शन देत आईबरोबरचा जुना फोटो शेअर केला आहे.

  • 13/21

    सायली संजीवने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आईबरोबरचा छान फोटो शेअर केला आहे. त्याला मातृदिनाच्या शुभेच्छा असं हॅशटॅग दिलंय.

  • 14/21

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता पृथ्विक प्रतापनेदेखील त्याच्या आईबरोबरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

  • 15/21

    फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असणारा विनोदवीर गौरव मोरेनेदेखील त्याच्या आईबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

  • 16/21

    दिग्दर्शक, लेखन, अभिनय आणि निर्माता अशा अनेक गोष्टींमध्ये पारंगत असणारा अभिनेता म्हणजेच रवी जाधव. रवी जाधव यांनी आईबरोबरचा फोटो शेअर करत त्यांच्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा तर दिल्याच आहेत पण त्यांच्या मुलाचा आणि पत्नीचा फोटो शेअर करत पत्नीलादेखील मातृदिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

  • 17/21

    नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘जुनं फर्निचर’ यात महत्वाची भूमिका साकारणाका अभिनेता भूषण प्रधान यानेदेखील त्याच्या आईबरोबरचे गोंडस फोटो शेअर केले आहेत.

  • 18/21

    ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूनेदेखील तिच्या आईबरोबरचा गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला सुंदर कॅप्शन देत तिने लिहिलं, “तू माझी सर्वात जवळची मैत्रीण आहेस, माझा आत्मविश्वास आहेस आणि एक अविश्वसनीय आई आहेस. तू माझ्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद आणला आहेस. तुझी मुलगी म्हणून मी खूप कृतज्ञ आहे.”

  • 19/21

    केदार शिंदे यांची लेक सनानेदेखील तिच्या आईबरोबरचा फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 20/21

    सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या आईच्या लग्नातला फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आणि कॅप्शन देत लिहिलं, “खरंतर रोजचा तुझा दिवस असतो. आज म्हटलं आपला फोटो टाकावा.”

  • 21/21

    प्रार्थना बेहेरेने तिच्या आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (All Photos- Social Media)

TOPICS
आईMotherप्रार्थना बेहरेPrarthana Behreफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरिंकू राजगुरूRinku Rajguruसायली संजीवSayali Sanjivस्वप्निल जोशीSwapnil Joshi

Web Title: Mothers day wishes from marathi celebrities swapnil joshi rinku rajguru gaurav more siddharth chandekar and others on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.