-
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनयासृष्टीत येण्यापूर्वी अभिनेत्री एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करत होती. त्यासाठी तिला फक्त ५०० रुपये मिळायचे. श्वेता तिवारीने आपल्या करिअरची सुरुवात ‘कलीरें’ या मालिकेतून केली होती, मात्र ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेमधून तिने लोकप्रियता मिळवली.
-
श्वेता तिवारीने अलीकडेच एका मुलाखतीत ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेमधील तिच्या पहिल्या पगाराबद्दल खुलासा केला. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिने या शोमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा तिला दिवसाला ५,०० रुपयांचे मानधन मिळायचे.
-
अभिनेत्रीने टीव्हीच नाही पण बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही कम केले आहे. श्वेता तिवारीने पुढे सांगितले की, जेव्हा तिने ‘कसौटी जिंदगी जी’ शो सोडला तेव्हा तिला प्रतीदिन २.२५ लाख रुपये मिळायचे.
-
अभिनेत्रीने संगीतले की दरवर्षी इन्क्रीमेंट होत असल्यामुळे माझा रोजचा पगार लाखांवर पोहोचला. या शोमधून अभिनेत्रीला फक्त पैसेच मिळाले नाहीत तर खूप प्रसिद्धीही मिळाली.
-
श्वेता तिवारीने लहान वयातच काम करायला सुरुवात केली होती. अभिनेत्रीचा पहिला पगार फक्त ५०० रुपये होता. आधी ती एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करायची.
-
श्वेता तिवारीने नंतर ‘आने वाला पल’ आणि ‘कहीं किसी रोज’ सारख्या मालिकांमध्ये काम केले. या मालिकेद्वारे तिला मोठे नाव आणि प्रसिद्धी मिळाली. आता ती टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.
-
वयाच्या १६ व्या वर्षापासून श्वेताने कामं करायला सुरुवात केली होती आणि आपल्या प्रसिद्धी आणि यशामुळे आता तिला कामासाठी जवळपास ३ लख रुपयांचे मानधन मिळते.
-
(सर्व फोटो : श्वेता तिवारी/इंस्टाग्राम)
केवळ ५ हजार रुपयांपासून सुरू केलेला ‘कसौटी जिंदगी की’चा प्रवास; श्वेता तिवारी आज घेते तब्बल ‘एवढं’ मानधन
‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या अभिनय कौशल्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. अभिनेत्री सध्या टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
Web Title: Started kasauti zindagi ki journey from just rs 5000 today shweta tiwari earns a whopping prize for her roles arg 02