-
फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्स त्यांच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतात. या स्टार्सचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य सांभाळण्याचे काम त्यांचे व्यवस्थापक (मॅनेजर्स) करतात. हे तारे दरवर्षी त्यांच्या व्यवस्थापकांना मोठी रक्कम मानधन म्हणून देतात. (@poojadadlani02/Insta)
-
माध्यमांतील माहितीनुसार शाहरुख खान दरवर्षी त्याच्या मॅनेजरला पगार म्हणून मोठी रक्कम देतो. (@poojadadlani02/Insta)
-
कोण आहे त्याचा मॅनेजर? आणि किती रक्कम मानधन म्हणून त्याला दिली जाते हे जाणून घेऊ. (@poojadadlani02/Insta)
-
शाहरुख खानच्या मॅनेजरचे नाव पूजा ददलानी असून ती गेल्या १२ वर्षांपासून त्याच्यासोबत काम करत आहे. तिच्या आधी पूजा दीपिका पदुकोणची मॅनेजर होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान दरवर्षी पूजा ददलानीला ९ कोटी रुपये पगार देतो. त्याच वेळी, पूजाची एकूण संपत्ती सुमारे ६० कोटी रुपये आहे. (@poojadadlani02/Insta)
-
प्रियांका चोप्राची मॅनेजर अंजुला आचार्यही मोठी फी घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंजुला दरवर्षी सुमारे ६ कोटी रुपये फी आकारते. (@anjula_acharia/Insta)
-
करीना कपूर खानची मॅनेजर पूनम दमानिया तिच्यासोबत खूप दिवसांपासून जोडली गेली आहे. अभिनेत्री तिच्या मॅनेजरला सुमारे ३ कोटी रुपये वार्षिक पगार देते. (@poonamdamania/iNSTA)
-
अक्षय कुमारच्या मॅनेजरचे नाव झेनोबिया खोला असून ती बॉलिवूडच्या महागड्या मॅनेजरपैकी एक आहे. अक्की त्याच्या मॅनेजरला दरवर्षी सुमारे अडीच कोटी रुपये पगार देतो. (@zenobia.kohla/Insta)
-
रणवीर सिंगही त्याच्या मॅनेजरला मोठा पगार देतो. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर रणवीर सिंग त्याची मॅनेजर सुझान रॉड्रिग्जला दरवर्षी २ कोटी रुपये पगार देतो. (@susanrodrigues23/Insta)
PHOTOS : शाहरुख खान ते अक्षय कुमारपर्यंत, बॉलीवूडच्या बड्या स्टार्सचे ‘हे’ महागडे मॅनेजर्स वर्षाला घेतात तगडं मानधन! वाचा माहिती
Most Expensive Managers of Bollywood Stars : बॉलिवूड स्टार्सचे असे अनेक मॅनेजर आहेत जे दरवर्षी कोट्यावधी रुपये मानधन घेतात. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या मॅनेजर्सच्या यादीत शाहरुख खानच्या मॅनेजरचा समावेश होतो.
Web Title: From shahrukh khan to akshay kumar they pay crores of rupees to their managers every year spl