-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवीन चित्रपट ‘फुलवंती’ प्रदर्शित झाला आहे. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.
-
या चित्रपटात प्राजक्ता माळीने मुख्य भूमिका साकारली आहे,
-
हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
-
चित्रपटातील तिच्या नृत्याचे दृश्ये लक्षवेधी आहेत. प्राजक्ताने सलग सहा दिवस नृत्याचे शुटिंग केले होते, ज्याबद्दल प्रवीण तरडेंनी ‘दैवी‘ असे वर्णन केले होते. दरम्यान शुटींगवेळीचे मस्तानी महालातील फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमधील तिची अदाकारी लक्ष वेधत आहे. चित्रपटातील तिच्या नृत्यातील ऊर्जा आणि नृत्यकौशल्यानेही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. हा चित्रपट अजूनही काही चित्रपटगृहांमध्ये उपलब्ध आहे.
-
तसेच ‘फुलवंती‘ गाण्यातील तिच्या अदाकारीने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे..
-
‘फुलवंती‘ गाण्याचे गीतकार वैभव जोशी, विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे आहेत, तर आर्या आंबेकरने हे गाणं गायलं आहे. या गाण्यात प्राजक्ताच्या उत्कृष्ट नृत्याने प्रेक्षकांना आकर्षित केले.
-
याशिवाय चित्रपटातील ‘मदनमंजिरी’ हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झालं.
-
(सर्व फोटो सौजन्य- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
हेही पाहा – “नशेच्या अवस्थेत लग्नाला…”, जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या लग्नाबाबत अन्नू कपूर यांनी केला रंजक खुलासा
Photos : फुलवंती फेम प्राजक्ता माळीची ठसकेबाज अदाकारी, मस्तानी महालातील नृत्याचे फोटो व्हायरल
फुलवंती‘ चित्रपटामध्ये नर्तिकेची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताचे सेटवरील नवे फोटो पाहा.
Web Title: Phullwanti movie fame prajakta mali beautiful dance poses from the mastani mahal set see photos spl