• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pushpa 2 villain fahadh faasil net worth wife education deatils spl

Pushpa 2: अल्लू अर्जुनपेक्षा जास्त भाव खावून गेला खलनायक भंवर सिंग; कोण आहे हा अभिनेता? त्याची पत्नी, शिक्षण आणि संपत्तीबद्दल जाणून घ्या

Pushpa 2 Villain Fahadh Faasil : ‘Pushpa 2’ रिलीज झाल्यापासूनच सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. नायक अल्लू अर्जुनपेक्षा चित्रपटात खलनायकाचे पात्र साकारणाऱ्या फहाद फासिलचेच जास्त कौतुक होत आहे. चला त्याच्या वयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी जाणून घेऊयात.

Updated: December 7, 2024 13:22 IST
Follow Us
  • Pushpa 2 Villain Fahadh Faasil Net Worth Wife Education
    1/9

    ‘Pushpa 2: the rule’ हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. सर्व कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चाहतेही याबद्दल खूप उत्सुक आहेत आणि बॉक्स ऑफिसचे आकडे वाढतच चालले आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्याशिवाय इतर स्टारकास्टबद्दल बोलायचे तर, फहाद फाजील देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. फहाद एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे.

  • 2/9

    मल्याळम चित्रपटसृष्टीत फहाद खूप प्रसिद्ध आहे. ‘चोप्पा कुरीशु’, “नजन प्रकाशन’ आणि “ट्रान्स’ सारख्या थ्रिलर चित्रपटांमध्ये काम करून तो प्रसिद्धीझोतात आला. या चित्रपटांनंतर त्याचे मानधनही वाढले आहे.

  • 3/9

    Part 1 प्रमाणेच ‘Pushpa 2’ मध्ये फहाद एसपी भंवर सिंगच्या भूमिकेत आहे. त्याच्या चाहत्यांना तो खूप आवडला पण काही लोकांचे म्हणणे आहे की खलनायकाच्या भूमिकेत फहादचा योग्य वापर केला गेला नाही आणि त्याला कमकुवत दाखवण्यात आले.

  • 4/9

    एनरिचेस्टच्या अहवालानुसार, फहाद फाजिलची एकूण संपत्ती ३६ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. तो जाहिराती, रिअल इस्टेट गुंतवणूक आणि चित्रपटांमधून चांगली कमाई करतो.

  • 5/9

    फहादच्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाल्यास तो पहिल्याच चित्रपटात अयशस्वी झाल्यानंतर त्याच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. त्याने सिने जगताशी निगडित कोर्सेसच केले आहेत.

  • 6/9

    फहाद फासिलच्या कुटुंबाला मल्याळम चित्रपट सृष्टीत मोठा इतिहास आहे. त्याचे वडील फाजील हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत.

  • 7/9

    त्याचा पहिला चित्रपट यशस्वी नसला तरी फहादची चिकाटी आणि वडिलांचे मार्गदर्शन याचा त्याच्या करिअरवर प्रभाव पाहायला मिळतो.

  • 8/9

    फहाद फाजिलने २०१४ मध्ये अभिनेत्री नाझरिया नाझिमशी लग्न केले. ‘बंगलोर डेज अँड ट्रान्स’मध्ये नाझरिया त्याची नायिका होती. ही जोडी आता एकत्र चित्रपट बनवते.

  • 9/9

    अल्लू अर्जुन स्टारर या चित्रपटात फहादने भंवर सिंग शेखावत या पोलिसाची भूमिका साकारली आहे. खलनायकाच्या भूमिकेत त्यांने एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. (All Photos Source : Stills From Flims)
    हेही पाहा- Photos : हंसिका मोटवानीचा व्हेकेशन मोड; मालदीवमध्ये नवऱ्याबरोबर करतेय एन्जॉय, पाहा फोटो

TOPICS
अल्लू अर्जुनAllu ArjunमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरश्मिका मंदानाRashmika Mandanna

Web Title: Pushpa 2 villain fahadh faasil net worth wife education deatils spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.