• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress swarda thigale replace tejashri pradhan in premachi goshta serial pps

Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा घेणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही

अभिनेत्री तेजश्री प्रधानने घेतला मोठा निर्णय, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला केला रामराम

January 7, 2025 18:17 IST
Follow Us
  • marathi actress swarda thigale replace tejashri pradhan in premachi goshta serial
    1/15

    मराठी मालिकाविश्वातील सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’. याच मालिकेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

  • 2/15

    अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • 3/15

    ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्रीची जागा मराठीसह हिंदी मालिकाविश्वात झळकलेली अभिनेत्री घेणार आहे.

  • 4/15

    आता मुक्ता म्हणून अभिनेत्री स्वरदा ठिगळे झळकणार असल्याचं समोर आलं आहे.

  • 5/15

    ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली स्वरदा ठिगळे काही दिवसांनी मुक्ता म्हणून पाहायला मिळणार आहे.

  • 6/15

    माहितीनुसार, स्वरदा लवकरच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

  • 7/15

    स्वरदा ठिगळेबद्दल बोलायचं झालं तर, तिने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं.

  • 8/15

    त्यानंतर स्वरदा हिंदी मालिकेत झळकली. तिने ‘सावित्री देवी कॉलेज’ या हिंदी मालिकेत काम केलं होतं.

  • 9/15

    तसंच स्वरदाने ‘प्यार के पापड’ मालिकेत पाहायला मिळत आहे. या दोन हिंदी मालिकेनंतर ती पुन्हा मराठी मालिकाविश्वाकडे वळाली.

  • 10/15

    ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत स्वरदाने ताराराणी यांची भूमिका उत्तमरित्या साकारली.

  • 11/15

    ताराराणी या भूमिकेसाठी स्वरदाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

  • 12/15

    गेल्या वर्षी स्वरदा लग्नबंधनात अडकली.

  • 13/15

    स्वरदाचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला होता. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

  • 14/15

    स्वरदाच्या नवऱ्याचं नाव सिद्धार्थ राऊत असं आहे.

  • 15/15

    अभिनेत्रीचा नवरा सिद्धार्थ हा इंटिरियर डिझायनर असल्याची माहिती त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर दिली आहे. ( सर्व फोटो सौजन्य – स्टार प्रवाह, तेजश्री प्रधान आणि स्वरदा ठिगळे इन्स्टाग्राम )

TOPICS
तेजश्री प्रधानTejashree PradhanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Marathi actress swarda thigale replace tejashri pradhan in premachi goshta serial pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.