• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these bollywood actors have worked in pakistani films spl

बॉलीवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी पाकिस्तानी चित्रपटांमध्ये केलाय अभिनय…

जाणून घेऊया अशा काही स्टार्सबद्दल ज्यांनी पाकिस्तानी कलाकृतीमध्ये अभिनय केला आहे.

Updated: February 15, 2025 12:59 IST
Follow Us
  • Indian actors who worked in Pakistan, Indian actors in Pakistani films
    1/10

    अनेक बॉलीवूड कलाकारांनी हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. टीव्ही जगतातील कलाकारांनीही मोठी लोकप्रियता मिळवली आहे. छोट्या पडद्यावरील असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी टीव्ही जगतात आपल्या कामाची छाप सोडली आहे, एवढेच नाही तर त्यांनी पाकिस्तानी मालिका आणि चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. (Photo: Indian Express)

  • 2/10

    चला जाणून घेऊया अशाच काही स्टार्सबद्दल ज्यांनी पाकिस्तानी कलाकृतींमध्ये अभिनय केला आहे. (Photo: Indian Express)

  • 3/10

    श्वेता तिवारी
    ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री श्वेता तिवारीने ‘सल्तनत’ या पाकिस्तानी चित्रपटात अभिनेता अहसान खानसोबत काम केले. माध्यमांतील माहितीनुसार या चित्रपटाचे चित्रीकरण दुबईमध्ये झाले होते. (Photo: Indian Express)

  • 4/10

    सारा खान
    ‘विदाई’मधून लोकप्रिय झालेली सारा खान ‘ससुराल सिमर का’ आणि बिग बॉसमध्ये दिसली होती. अभिनेत्रीने पाकिस्तानी अभिनेता नूर हसनबरोबर ‘ये कैसी मोहब्बत है’ या पाकिस्तानी मालिकेत काम केला आहे. (Photo: Indian Express)

  • 5/10

    नेहा धुपिया
    बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपियाचेही नाव या यादीमध्ये समाविष्ट आहे. नेहाने केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतही तिचे अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. नेहाने ‘कभी प्यार ना करना’ या चित्रपटात एक आयटम सॉंग केले होते. (Photo: Indian Express)

  • 6/10

    किरण खेर
    बॉलीवूड अभिनेत्री किरण खेर यांनी एका पाकिस्तानी चित्रपटात अभिनय केला आहे. ‘खामोश पानी’ या २००३ मधील चित्रपटात त्या दिसल्या होत्या. (Photo: Indian Express)

  • 7/10

    रिपोर्ट्सनुसार किरण यांना स्वित्झरलंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. (Photo: Indian Express)

  • 8/10

    अरबाज खान
    अभिनेता अरबाज खान पाकिस्तानी चित्रपट ‘गॉडफादर’मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याने शाकिर खान नामक भूमिका साकारली होती. (Photo: Indian Express)

  • 9/10

    नसिरुद्दीन शाहा हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. नसुरीदिन यांनीही पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. (Photo: Indian Express)

  • 10/10

    त्यांनी ‘खुदा के लिए’ या पाकिस्तानी चित्रपटात काम केले होते तर ‘जिंदा भाग’ या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. (Photo: Indian Express) हेही पाहा- Valentine’s Day 2025 : प्रियांका चोप्रा, शिल्पा शेट्टी ते बिपाशा बासू , बॉलीवूड कपल्सनी ‘असा’ साजरा केला व्हॅलेंटाईन डे…

TOPICS
अरबाज खानArbaaz Khanकिरण खेरKirron Kherनेहा धुपियाNeha Dhupiaपाकिस्तानPakistanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsश्वेता तिवारीShweta Tiwari

Web Title: These bollywood actors have worked in pakistani films spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.