Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sikandar trailer takes social media by storm new poster unveiled spl

सलमान खानच्या ‘सिकंदर’च्या ट्रेलरने घातला धुमाकूळ, चित्रपटाचं नवं पोस्टर व्हायरल…

Salman Khan Eid Release: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर २३ मार्च रोजी एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित झाला. या खास प्रसंगी बॉलिवूडमधील अनेक तारे आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होते.

March 24, 2025 17:55 IST
Follow Us
  • Sikandar Trailer Launch
    1/12

    बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर २३ मार्च रोजी एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित झाला. या खास प्रसंगी बॉलिवूडमधील अनेक तारे आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होते. (Photo Source: Jansatta)

  • 2/12

    ट्रेलर लाँच होण्यापूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने ३० मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. (Photo Source: Jansatta)

  • 3/12

    सलमान खान एका नवीन लूकमध्ये दिसला
    चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सलमान खान त्याच्या डॅशिंग लूकमध्ये दिसला. बऱ्याच दिवसांनी, अभिनेता क्लिन-शेव्ह अवतारात दिसला. (Photo Source: Jansatta)

  • 4/12

    यावेळी सलमान खानने नेव्ही ब्लू टी-शर्ट आणि स्काय ब्लू ब्लेझर घातला होता, ज्यामुळे त्याचा लूक आणखी खुलला. त्याच्या चष्म्याने त्याच्या लूकमध्ये भर घातली. (Photo Source: Jansatta)

  • 5/12

    साजिद नाडियाडवालाचा नवा लूक चर्चेत आहे.
    चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला देखील त्यांच्या नवीन लूकमध्ये दिसले आणि त्यांनी त्यांच्या डेनिम ड्रेसमघील लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले. याशिवाय चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगादोस यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. (Photo Source: Jansatta)

  • 6/12

    अनेक स्टार्स उपस्थित होते
    ‘सिकंदर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अनेक बॉलिवूड स्टार्सनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात अभिनेता शर्मन जोशी आणि अंजिनी धवन, चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारे दाक्षिणात्य अभिनेते सत्यराजही उपस्थित होते. (Photo Source: Jansatta)

  • 7/12

    चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला
    ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी यांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळाले. (Photo Source: Jansatta)

  • 8/12

    सलमान खान त्याच्या दमदार शैलीत अ‍ॅक्शन करताना दिसतोय. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहेत. (Photo Source: Jansatta)

  • 9/12

    चित्रपटाच्या प्रदर्शनाची आणि आगाऊ बुकिंगची माहिती
    ‘सिकंदर’ हा या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. हैदराबाद आणि मुंबईमध्ये याचे मोठ्या प्रमाणात चित्रीकरण झाले आहे. (Photo Source: Jansatta)

  • 10/12

    चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनीही घोषणा केली की ‘सिकंदर’ चित्रपटाचे आगाऊ तिकीट बुकिंग २५ मार्चपासून सुरू होईल. चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे आणि सत्यराज या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. (Photo Source: Jansatta)

  • 11/12

    ‘सिकंदर’ ईदला प्रदर्शित होणार आहे.
    सलमान खानचा हा बिग बजेट चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Photo Source: Jansatta)

  • 12/12

    त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ट्रेलरनेही उत्सुकता आणखी वाढवली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणे बाकी आहे. (Photo Source: Jansatta) हेही पाहा- आयपीएलचे चाहते आहात? तर मग क्रिकेटप्रेमींनो ‘हे’ ८ बॉलीवूड चित्रपट अजिबात चुकवू नका

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरश्मिका मंदानाRashmika Mandannaसलमान खानSalman Khan

Web Title: Sikandar trailer takes social media by storm new poster unveiled spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.