-
उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत सांगितले आहे की, उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराजवळ तिच्या नावाचेही एक मंदिर आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. (Photo: Urvashi/Instagram)
-
अनेकांनी ती धार्मिक भावना दुखावत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, उर्वशीच्या टीमने या प्रकरणाबाबत एक खुलासा शेअर केला आहे आणि म्हटले आहे की, ते उर्वशी रौतेलाचे मंदिर नाही. (Photo: Urvashi/Instagram)
-
उर्वशी रौतेलाने याआधी स्वतःची तुलना शाहरुख खानशी केली आहे. तिने सांगितले होते की, ती किंग खाननंतर बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मागणी असलेली प्रमोटर आहे. ती म्हणाली, ‘लोक म्हणतात की शाहरुख खाननंतर उर्वशी रौतेला ही चित्रपटांची सर्वोत्तम प्रमोटर आहे. (Photo: Urvashi/Instagram)
-
“जर तुम्हाला तुमच्या चित्रपटाचे प्रमोशन करायचे असेल तर उर्वशी रौतेलाला कॉल करा! मी हॉलिवूड सीरीज ‘रीचर सीझन ३’ चे प्रमोशन देखील केले. शोच्या प्रमोशनसाठी सिनेमाच्या निर्मात्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता.” तिच्या या वक्तव्यावरूनही अभिनेत्रीला खूप ट्रोल केले गेले. (Photo: Urvashi/Instagram)
-
उर्वशी रौतेलाने दुसऱ्या एका एका मुलाखतीत सांगितले होते की, वाराणसीहून दिल्लीला परतताना ती मिस्टर. आरपीला भेटणार होती, पण तिला झोप लागली. या संभाषणात उर्वशीने पंतचे नाव घेतले नव्हते. पण लोकांनी याचा संबंध ऋषभ पंतबरोबर जोडला होता. यानंतर दोघांनीही एकमेकांची खिल्ली उडवली होती आणि नेटकऱ्यांनीही त्यांना ट्रोल केले होते. (Photo: Urvashi/Instagram) -
जेव्हा उर्वशी रौतेलाला सैफ अली खानवरील हल्ल्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली होती, “हे खूप दुर्दैवी आहे. आता डाकू महाराज सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०५ कोटी रुपये कमावले आहेत आणि माझ्या आईने मला हिऱ्याची रोलेक्स भेट दिली आहे तर माझ्या वडिलांनी मला अंगठीचे घड्याळ भेट दिले आहे. असे हल्ले होण्याची असुरक्षितता असल्यामुळे आम्हाला उघडपणे या गोष्टी घालण्याचा आत्मविश्वास राहत नाही. तरी जे काही घडले ते खूप दुर्दैवी आहे.” याबद्दलही अभिनेत्रीचे खूप ट्रोलिंग झाले. (Photo: Urvashi/Instagram) -
उर्वशी रौतेलाने अभिनेता पवन कल्याण आणि साई धर्म तेज यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट केला होता आणि कॅप्शनमध्ये तिने पवन कल्याण यांना ‘आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री’ असे संबोधले होते. मग काय यासाठीही नेटकऱ्यांकडून अभिनेत्रीची खूप खिल्ली उडवण्यात आली होती. (Photo: Urvashi/Instagram) -
२०२३ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये, अभिनेत्रीने दावा केला होता की ती लवकरच दिवंगत अभिनेत्री परवीन बाबी यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. (Photo: Urvashi/Instagram)
-
तथापि, वृत्तांनुसार, त्यात कोणतेही तथ्य नव्हते. असे सांगितले जात आहे की अभिनेत्रीला कोणत्याही प्रॉडक्शन हाऊसने अशा कोणत्याही प्रोजेक्टसाठी साइन केलेले नाही. (Photo: Urvashi/Instagram) हेहा पाहा- समांथा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यला म्हणतेय देखणा, हृतिक रोशनचे लूक पसंत नाहीत; सध्या कोणाला करतेय डेट?
ऋषभ पंत ते शाहरुख खान; उर्वशी रौतेलाला याआधीही नेटकऱ्यांनी ‘या’ ५ विधानांवरून प्रचंड ट्रोल केले आहे…
उर्वशी रौतेला तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. तिच्या विधानांमुळे तिला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अलिकडेच तिने उत्तराखंडमध्ये तिच्या नावावर एक मंदिर असल्याचा दावा केला आहे, त्यानंतर सोशल मीडियावर बराच गदारोळ सुरू आहे.
Web Title: Urvashi rautela temple comment near badrinath actress 5 controversial statements trolled rishabh pant saif ali khan attack spl