-
अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ती ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
-
वैयक्तिक आयुष्यात, अभिनेत्री शरयू सोनावणेने म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या ‘पारू’ने २०२३ मध्ये जयंत लाडेशी लग्नगाठ बांधली.
-
अभिनेत्रीने हे लग्न वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने लग्न झाल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून ती सातत्याने नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत असते.
-
शरयूने आषाढी एकादशीनिमित्त पतीसह पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेतलं.
-
“आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला..” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
शरयूचा पती जयंतबद्दल सांगायचं झालं, तर तो सुद्धा मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहे. तो फिल्ममेकर व निर्माता म्हणून ओळखला जातो.
-
अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत ‘अ पेईंग घोस्ट’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा जयंतने सांभाळली होती.
-
याशिवाय उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, संजय जाधव, भरत गणेशपुरे अभिनीत ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती देखील शरयूच्या नवऱ्याने केली होती. या चित्रपटात शरयू सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.
-
“माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो मला मदत करतो आणि तो खूप जास्त सकारात्मक आहे. म्हणजे नकारात्मक गोष्टीला सुद्धा सकारात्मक दृष्टीने कसं बघायचं? त्या गोष्टी आपण कशा सकारात्मकपणे घ्यायच्या? हे त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे.” असं शरयूने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवऱ्याचं कौतुक करताना सांगितलं होतं. ( सर्व फोटो सौजन्य : शरयू सोनावणे इन्स्टाग्राम )
‘पारू’च्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिलंत का? एकत्र घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन, तिचा पती काय काम करतो?
‘पारू’ने पतीसह घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन, पाहा सुंदर फोटो…
Web Title: Paaru fame actress sharayu sonawane husband jayant lade visited pandharpur temple on the occasion of ashadi ekadashi sva 00