-
दाक्षिणात्य अभिनेत्री आता केवळ त्यांच्या प्रदेशापूरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर त्यांचे चाहते आता जगभर पाहायला मिळतात. विविध भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याचा फायदा या कलाकारांना होतोय. त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढते आहे. (File Photo)
-
दरम्यान आज आपण जाणून घेऊयात की साऊथ सिनेक्षत्रातल्या नावाजलेल्या अभिनेत्री २०२५ मध्ये किती मानधन घेतात. त्यांच्यापैकी सर्वाधिक मानधन घेणारी कोण अभिनेत्री आहे? (File Photo)
-
साई पल्लवी
३२ वर्षीय सुंदर अभिनेत्री साई पल्लवीने नागा चैतन्यबरोबरच्या थंडेल या अॅक्शनपटासाठी ५ कोटी रुपये मानधन घेतले होते. साई प्रत्येक चित्रपटासाठी ३ ते १५ कोटी रूपये घेते असे वृत्त दैनिक जागरणने दिले आहे. साई पल्लवी ‘रामायण’मध्ये रणबीर कपूरबरोबर झळकणार आहे, या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार तिने रामायणच्या तिन्ही भागांसाठी प्रत्येकी ६ कोटींचं मानधन घेतलं आहे. (File Photo) -
रश्मिका मंदाना
पुष्पा १, पुष्पा २ आणि छावा फेम रश्मिका मंदाना लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. Siasat.com च्या माहितीनुसार तिने पुष्पा २ साठी १० कोटी, छावासाठी ४ कोटी व सलमान खानबरोबरच्या सिकंदरमधल्या भूमिकेसाठी १३ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. (File Photo) -
नयनतारा
२०१८ च्या फोर्ब्स इंडियाच्या ‘सेलिब्रिटी १००’ यादीमध्ये स्थान मिळवणारी एकमेव दाक्षिणात्य अभिनेत्री अशी ओळख असणारी नयनतारा भारतातली सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. IMDb नुसार ती प्रत्येक चित्रपटासाठी ३ ते ५ कोटींचं मानधन घेते. (File Photo) -
त्रिशा कृष्णन
त्रिदशाने तमिळ, तेलगू चित्रपटांमध्ये दोन दशकांहून अधिक काळ काम केले आहे. इकॉनॉमिक टाईम्सनुसार ती प्रत्येक चित्रपटासाठी १०-१२ कोटी रुपये कमावते. तिचा आगामी सिनेमा ‘विश्वंभरा’ आहे. (File Photo) -
अनुष्का शेट्टी
बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीला २०१० मध्ये तामिळनाडू सरकारने कलैमामणी पुरस्काराने सन्मानित केले आहे. IMDb नुसार तिचे मानधन ५ ते ७ कोटी रुपये आहे. (File Photo) -
तमन्ना भाटिया
तमन्नाही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी तमन्ना भारतभर लोकप्रिय झाली. तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, तीन संतोषम फिल्म पुरस्कार, दोन SIIMA पुरस्कार आणि कलैमामणी पुरस्कार यांचा समावेश आहे. GQ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ती प्रत्येक चित्रपटासाठी ४ कोटी ते ५ कोटी रुपये घेते. (File Photo) -
समांथा रूथ प्रभू
समांथादेखील दक्षिण भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. IMDb नुसार, ती प्रत्येक चित्रपटासाठी ३ ते ८ कोटी रुपये घेते. (File Photo) हेही पाहा- Photos : “ही साडी अभिमानाने परिधान केली…”; सायली पाटीलचं मराठमोळ्या लूकमधलं फोटोशूट चर्चेत…
साई पल्लवी ते रश्मिका मंदाना; २०२५ मध्ये चित्रपटाच्या मानधनातून कोणं कमावतेय सर्वाधिक पैसे?
Highest Paid South Indian Actresses Of 2025: विविध भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याचा फायदा या कलाकारांना होतोय. त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढते आहे. दरम्यान आज आपण जाणून घेऊयात की साऊथ सिनेक्षत्रातल्या नावाजलेल्या अभिनेत्री २०२५ मध्ये किती मानधन घेतात. त्यांच्यापैकी सर्वाधिक मानधन घेणारी कोण अभिनेत्री आहे?
Web Title: Ramayana actress sai pallavi to pushpa actress rashmika mandana highest paid south indian actresses of 2025 full list spl