Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. photos of unique banner posters of history by bhau rangari ganpati mandal in pune svk 88 pbs

Photos : पुण्यातील मानाच्या श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीचा इतिहास काय? मंडळाकडून अनोख्या फलकांचं प्रदर्शन, पाहा…

पुण्यात उत्साही व मंगलमय वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे आगमन झाले.

August 31, 2022 18:11 IST
Follow Us
  • पुण्यात 'गणपती बाप्पा मोरया', 'मंगलमूर्ती मोरया' गजरात, सनई व चौघड्यांची सुरात, शंख नाद आणि ढोल ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद आणि पारंपरिक रथ अशा उत्साही व मंगलमय वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे आगमन झाले. (छायाचित्र सौजन्य - सागर कासार)
    1/24

    पुण्यात ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ गजरात, सनई व चौघड्यांची सुरात, शंख नाद आणि ढोल ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद आणि पारंपरिक रथ अशा उत्साही व मंगलमय वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे आगमन झाले. (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

  • 2/24

    राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

  • 3/24

    यावेळी मंडळाचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन, मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, जान्हवी धारीवाल-बालन, भाजप संघटक सरचिटणीस राजेश पांडे, संदीप खर्डेकर आदी मान्यवरांसह मंडळाचे शेकडो कार्यकर्ते, गणेशभक्त उपस्थित होते.

  • 4/24

    मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “१८९२ पासूनची जुनी परंपरा असणारा, भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना आनंद होत आहे.”

  • 5/24

    “स्वातंत्र्यपूर्ण काळात भाऊसाहेब रंगारी मंडळाने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे,” असेही पाटलांनी नमूद केलं.

  • 6/24

    दरम्यान सकाळी सव्वा नऊ वाजता बाप्पांची मिरवणूक मंडपातून सुरू झाली.

  • 7/24

    श्री तांबडी जोगेश्वरी चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे सकाळ कार्यालय मार्गे पुन्हा मंडपात आली.

  • 8/24

    या मिरवणुकीतील रथाचे सारथ्य मंत्री पाटील यांच्यासह बालन दाम्पत्याने केले.

  • 9/24

    यावेळी श्रीराम, कलावंत, चेतक, वाद्यवृंद, अभेद्य, समर्थ, जगदंब या ढोलताशा पथकांबरोबरच नगारा, सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात, रथातून पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या मिरवणूक काढत श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

  • 10/24

    पुनीत बालन म्हणाले, “करोनाचे विघ्न दूर झाल्याने तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा त्याच जल्लोषात गणेशोत्सव साजरा करता येतोय, याचा मनस्वी आनंद आहे.”

  • 11/24

    “त्यामुळे हा गणेशोत्सव सर्वच गणेश भक्तांसाठी सर्वाथाने वेगळा आणि सामाजिक दायित्वाची जाणीव अधिक दृढ करणारा असणार आहे,” असंही बालन यांनी नमूद केलं. (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

  • 12/24

    श्रीमंत भाऊ रंगारी मंडळाच्या मिरवणुकीत अनोख्या फलकांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

  • 13/24

    या फलकांवर श्रीमंत भाऊ रंगारी मंडळाच्या गणपतीचा इतिहास सांगण्यात आला आहे.

  • 14/24

    मिरवणुकीत अनेक तरुण आपल्या हातात फलक घेऊन श्रीमंत भाऊ रंगारी मंडळाच्या इतिहासाची माहिती देत होते.

  • 15/24

    (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

  • 16/24

    (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

  • 17/24

    (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

  • 18/24

    (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

  • 19/24

    (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

  • 20/24

    (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

  • 21/24

    (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

  • 22/24

    (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

  • 23/24

    (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

  • 24/24

    (छायाचित्र सौजन्य – सागर कासार)

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025पुणेPuneपुणे न्यूजPune News

Web Title: Photos of unique banner posters of history by bhau rangari ganpati mandal in pune svk 88 pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.