-
यकृत हे आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचे अवयव आहे. हृदयाला ज्याप्रमाणे रक्ताभिसरणाचे केंद्र मानले जाते, त्याचप्रमाणे यकृत आपल्या संपूर्ण शरीराचे मेटबॉलिक केंद्र मानले जाते.
-
मद्य, तळलेले पदार्थ, जंकफूड, कोल्डड्रिंक यासारख्या अनेक पदार्थामुळे यकृताला नुकसान पोहचू शकते. यकृत निरोगी ठेवण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी, काही पदार्थांचे सेवन खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
-
एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झांजेर यांच्या मते, यकृत स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी काही पदार्थ उपयुक्त आहेत. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया यकृत निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत.
-
सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे सेवन केल्यास यकृत डिटॉक्स करता येते. पालक, मेथी आणि चाकवत या पालेभाज्या किडनी निरोगी बनवतात आणि यकृत स्वच्छ करतात.
-
ब्रोकोली, कोबी आणि फ्लॉवर सारख्या क्रूसिफेरस भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच पण या भाज्या यकृतदेखील निरोगी ठेवतात. या भाज्यांचे सेवन केल्याने यकृत डिटॉक्स करते.
-
ग्रीन टी आणि हर्बल टीचे सेवन करून यकृत सहजपणे डिटॉक्स केली जाऊ शकते. या चहाच्या सेवनाने वजन कमी करता येते आणि यकृत निरोगी ठेवता येते. ग्रीन टी अतिरिक्त चरबी कमी करते आणि यकृतमध्ये साचलेली घाण काढून टाकते.
-
औषधी गुणधर्मांनी समृद्ध लसणाचे सेवन केल्याने यकृत डिटॉक्स केले जाऊ शकते. लसूण सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे जे यकृतातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात. रोज एक लसूण पाकळीचे सेवन केल्याने फायदा होऊ शकतो.
-
यकृत डिटॉक्स करण्यासाठी हळदीचा औषधासारखा परिणाम होतो. हळद जळजळ वाढवणारे रेणू मारते आणि यकृत निरोगी ठेवते. हळदीमध्ये असलेले क्युरक्यूमिनॉइड्स यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात. तुम्ही हळद रोज दुधासोबत खाऊ शकता, ते खूप फायदेशीर ठरेल. (Photos: Freepik)
Food for Liver: यकृताच्या निरोगी आरोग्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल फायदेशीर; तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे
तज्ज्ञांकडून जाणून घेऊया यकृत निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत.
Web Title: Consuming these foods will be beneficial for healthy liver health learn the benefits from experts pvp