Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. know your body why you cant tickle yourself know what doctor says snk

तुम्ही स्वत:ला गुदगुदल्या करू शकत नाही? डॉक्टरांनी सांगितले कारण…

तुम्हाला जर कोणी गुदगुदल्या केल्या तर लगेच हसू येते पण तुम्ही कधी स्वत:ला गुदगुदल्या करून पाहिल्या आहेत का?

Updated: April 24, 2024 00:29 IST
Follow Us
  • 1/11

    Know Your Body : मानवी शरीर ज्या पद्धतीने काम करते आणि ज्या प्रकारे प्रतिक्रिया देते ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांच्या कार्याबाबत जाणून घेणे हे किती रंजक गोष्ट आहे. तुम्हाला असे वाटते असेल की तुम्हाला तुमच्या शरीराबाबत सर्व काही माहित आहे. पण हे सत्य आहे का? 

  • /know-your-body-why-you-cant-tickle-yourself-know-what-doctor-says
    2/11

    आता हेच बघा ना, तुम्हाला जर कोणी गुदगुदल्या केल्या तर लगेच हसू येते पण तुम्ही कधी स्वत:ला गुदगुदल्या करून पाहिल्या आहेत का? नसेल तर मग एकदा करून पाहा! तुम्हाला गुदगुदल्या होतायेत का? नाही ना! कारण आपण स्वत:ला गुदगुदल्या करूच शकत नाही. कदाचित हे तुम्हाला माहित नसेल पण हे सत्य आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? काळजी करू नका! तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

  • 3/11

    आपण स्वत:ला गुदगुल्या का करू शकत नाही
    राजकोट येथील, एचसीजी हॉस्पिटलचे, कन्सलटंट फिजिशियन, डॉ खुशाली लालचेता यांच्या मते, स्वतःला गुदगुल्या न करता येण्यामागे आपली मज्जासंस्था (nervous system) कारणीभूत आहे.

  • 4/11


    डॉ लालचेता सांगतात, ”गुदगुल्यामध्ये आश्चर्य आणि अनिश्चितता हे घटक असतात, ज्यामुळे स्पर्श आणि हास्यासंबंधित मज्जातंतूच्या प्रतिक्रियांची (neural responses) मालिका(cascade) सुरू होते. म्हणून, जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपला मेंदू संवेदनांचा अंदाज घेतो आणि प्रतिसाद कमी करतो आणि गुदगुल्या होण्याची भावनेकडे दुर्लक्ष करतो.”

  • 5/11

    मेंदूला स्वत:चा स्पर्श आणि इतरांचा स्पर्श ओळखता येतो
    “हे न्यूरल मेकॅनिझम, ज्याला संवेदी क्षीणन(sensory attenuation) म्हणून ओळखले जाते, जे स्वत: केलेल्या कृतीमुळे निर्माण होणाऱ्या संवेदना फिल्टर करण्यासाठी एक संरक्षणात्मक यंत्रणा(Protective mechanism) म्हणून काम करते. त्यामुळे आपल्याला स्वत:चा स्पर्श आणि इतरांचा स्पर्श यामध्ये फरक करता येतो. स्वत:ला गुदगुल्या केल्यानंतर हसू येत नाही कारण हे सर्व आपल्या स्वतःच्या शरीराला जाणून घेण्याच्या आणि नियंत्रित करण्याच्या आपल्या उल्लेखनीय क्षमतेची कमाल आहे.”

  • 6/11

    गुदगुल्यांचा शारीरिक आणि मानसिक पैलू लक्षात घ्या
    या प्रक्रियेचे वर्णन करताना, बंगळूरूच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजीचे सिनिअर कन्सटंट, डॉ कृष्णन पीआर गुदगुल्यांच्या शारीरिक पैलूबाबत सांगतात की, आपल्याला काखेत, तळव्यांना आणि बरगड्यांसारख्या संवेदनशील भागांना गुदगुल्या होतात, कारण शरीर मेंदूला संकेत पाठवते तेव्हा ज्या संवेदना जाणवतात त्यालाच आपण गुदगुदल्या म्हणतो.

  • 7/11

    गुदगुल्यांचा मनोवैज्ञानिक पैलूबाबत डॉ कृष्णन सांगतात की, ”गुदगुदल्या केल्यानंतर जाणवणारे आश्चर्य किंवा अनिश्चतता महत्त्वाचे घटक आहे. जेव्हा कोणी आपल्याला गुदगुल्या करतो तेव्हा आपल्याला त्याची अपेक्षा नसते. हे आश्चर्य गुदगुल्यांच्या संवेदना अधिक तीव्र करते. पण, जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो, तेव्हा मेंदूला आधीच माहित असते की, काय होणार आहे, त्यामुळे गुदगुल्या होण्याची संवेदना तितकी तीव्र नसते,”

  • 8/11

    स्वत:ला गुदगुदल्या केल्यानंतर मेंदू कसा काम करतो?
    डॉ कृष्णन म्हणाले की, ”शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणले आहे की, सेरेबेलम (जे हालचालीं नियंत्रण करणे आणि आपल्या कृतींच्या संवेदी परिणामांचा(sensory consequence)अंदाज लावण्यासाठी जबाबदार असते) हे आपल्या मेंदूचा एक भाग आहे जो आपल्याला स्वत:ला गुदगुल्या होण्यापासून प्रतिबंधित करतो.

  • 9/11

    जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो तेव्हा सेरेबेलमला आधीच माहित असते की काय होणार आहे. आपण स्वतःला गुदगुल्या करू शकत नाही या नियमाला काही अपवाद आहेत. स्किझोफ्रेनियासारख्या काही न्यूरोलॉजिकल स्थिती असलेल्या लोकांना स्वतःला केलेल्या गुदगुल्या जाणवू शकतात. काही लोक त्यांच्या स्वत:च्या हालचाली आणि परिणामी होणाऱ्या गुदगुल्या, दोन्हीमध्ये थोडा विलंब करून स्वत: ला गुदगुल्या करू शकत असल्याचे नोंदवले आहे,” असेही डॉ कृष्णन यांनी सांगितले.

  • 10/11

    पण, डॉ कृष्णन यांनी निदर्शनास आणून दिले की, स्वतःला गुदगुल्या न होणे ही एक क्लिष्ट प्रक्रिया (complex phenomenon) आहे जी पूर्णपणे समजलेली नाही”.

  • 11/11


    काही व्यक्तींना स्वतःला गुदगुल्या होतात?
    हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ” स्वत:ला गुदगुदल्या न होण्यासारख्या सामान्य घटनेलाही अपवाद असू शकतात,”असे मत मुंबई येथील पवईच्या डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटलमधील जनरल मेडिसिन अँड इन्फेक्शन डिसिज स्पेशालिस्ट, डॉ नीरज कुमार तुलारा यांनी नमूद केले.
    काही व्यक्तींना स्वतःला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करताना, विशेषत: शरीराच्या अधिक संवेदनशील भागात अजूनही सौम्य गुदगुल्याचा अनुभव येऊ शकतो. पण, त्याची तीव्रता सहसा दुसर्‍या व्यक्तीने गुदगुल्या केल्याच्या तुलनेत खूपच कमी असते,” असे डॉ तुलारा यांनी स्पष्ट केले. (सर्व फोटो सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits

Web Title: Know your body why you cant tickle yourself know what doctor says snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.