Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. should you begin your day with a detox drink experts answer snk

सकाळी उठल्यानंतर Detox Drink का प्यावे? तज्ज्ञांनी सांगितले कारण

आपल्या दिवसाची सुरुवात डिटॉक्स किंवा हर्बल ड्रिंक्सने करणे आवश्यक आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी संपर्क साधला.

April 25, 2024 06:00 IST
Follow Us
  • Should you begin your day with a detox drink experts answer
    1/12

    दिवसाची सुरुवात कशी करावी, याबाबत अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी कोणतेही ठराविक नियम नाहीत पण शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. याबाबत जेव्हा फिटनेस कोच दीक्षा छाब्रा यांनी दिवसाची सुरुवात करताना डिटॉक्स ड्रिंक घेण्याचा सल्ला दिला तेव्हा खरेच याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला.

  • 2/12

    ”दिवसाची सुरुवात एक ग्लास डिटॉक्स ड्रिंकने करावी. जसे की “ग्रीन टी, कोमट लिंबू पाणी, जिरे-ओवा पाणी, रात्रभर भिजवलेले आल्याचे पाणी, काकडी किंवा लिंबू मिसळलेले पाणी” असे दीक्षा छाब्रा यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. त्यांच्या मतानुसार, ”चांगले मॉर्निंग रुटीन वजन कमी करण्यास मदत करू शकते. ”

  • 3/12

    चांगले मॉर्निंग रुटीन तुमच्या निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहन देईल आणि तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाण्यासाठी मदत होईल. सोशल मीडिया टाळण्यापासून ते डिटॉक्स ड्रिंक पिण्यापर्यंत आणि व्यायाम करताना संगीत ऐकण्यापर्यंत आणि नंतर वर्कआउटनंतरचे चांगले जेवण आणि स्नॅक्स घेतल्यास, तुमचा दिवस प्रॉडक्टिव्ह किंवा उत्साही होऊ शकतो,” असे छाब्रा यांनी सांगितले आहे.

  • 4/12

    म्हणूनच, आपल्या दिवसाची सुरुवात डिटॉक्स किंवा हर्बल ड्रिंक्सने करणे आवश्यक आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी संपर्क साधला.

  • 5/12

    याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला जयपूर येथील नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या ज्येष्ठ आहारतज्ज्ञ, डॉ. सोनल भटनागर यांनी सांगितले की, ”मॉर्निंग रुटीनमध्ये हर्बल ड्रिंक्सचा समावेश असणे गरजेचे आहे की नाही हे वैयक्तिक प्राधान्ये आणि ध्येयांवर अवलंबून आहे.”

  • 6/12

    दिवसाची सुरुवात डिटॉक्स ड्रिंकने करावी का?

    “हर्बल ड्रिंक्स, जसे की हर्बल टी किंवा infusions याचे सेवन त्यांच्या संभाव्य आरोग्य फायद्यांसाठी आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने करण्याचा एक मार्ग म्हणून केला जातो. पण, त्यांना आपल्या मॉर्निंग रुटीनमध्ये हे समाविष्ट करण्याचा निर्णय ही शेवटी प्रत्येकाची वैयक्तिक निवड आणि प्रत्येकाच्या लाइफस्टाइलच्या विविध घटकांवर अवलंबून असते,” असे डॉ. भटनागर यांनी सांगितले आहे.

  • 7/12

    हर्बल ड्रिंक्सचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे-
    डॉ. भटनागर यांच्या मते, हर्बल ड्रिंक्सचे आरोग्यासाठी विविध फायदे आहेत, ज्यामध्ये हायड्रेशन, विश्रांती (relaxation) किंवा विशिष्ट औषधी वनस्पतींशी संबंधित संभाव्य आरोग्य फायदे यांचा समावेश होतो. “उदाहरणार्थ, ग्रीन टी बहुतेकदा त्याच्या अँटिऑक्सिडंट्स गुणधर्मासाठी वापरली जाते, तर कॅमोमाइल चहा त्याच्या शांत गुणधर्मांसाठी( calming properties) ओळखला जातो.

  • 8/12

    काही लोकांना असे आढळून आले आहे की, त्यांच्या मॉर्निंग रुटीनमध्ये हर्बल ड्रिंक्सचा समावेश केल्याने त्यांना अधिक उत्साही वाटण्यास मदत होते किंवा निरोगी असल्याची भावना जाणवते,” डॉ. भटनागर यांनी स्पष्ट केले

  • 9/12

    त्येक व्यक्तीसाठी त्याचा परिणाम वेगळा असू शकतो
    ”पण, हे लक्षात घ्या की, हर्बल ड्रिंकचा प्रभावीपणा( effectiveness) आणि विशिष्ट फायदे वैयक्तिक आणि विशिष्ट औषधी वनस्पतींचे सेवन यावर अवलंबून बदलू शकतात. काही लोकांना सकारात्मक परिणाम जाणवू शकतात, तर इतरांना कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे लक्षात येत नाहीत.

  • 10/12

     “याशिवाय, विशिष्ट औषधी वनस्पतींमुळे होणार्‍या कोणत्याही संभाव्य परस्परक्रिया ( potential interactions ) किंवा दुष्परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे, विशेषत: जर तुम्हाला आधीपासून अस्तित्वात असलेली एखादी वैद्यकीय स्थिती असेल किंवा तुम्ही एखादे औषधे घेत असाल तर,” असे डॉ. भटनागर यांनी सांगितले.

  • 11/12

    रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे?
    कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत आणि रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्यास फायदे वाढतात, असे नोंदणीकृत आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले. “कोमट पाणी पिणे हा शरीराला डिटॉक्स करण्याचा एक चांगला मार्ग आहे; 

  • 12/12

    कारण ते आतड्यांमधून जमा झालेले विष आणि अन्नाचे अवशेष काढून टाकते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने त्याला व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमचा डोस मिळतो, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे,” असे गोयल यांनी सांगितले.

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Should you begin your day with a detox drink experts answer snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.